इंदापूर : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
भारतीय जनता पार्टीच्या वतीने इंदापूरमध्ये आज शहरातून तिरंगा बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते,भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वर्ष दिनानिमित्त,हर घर तिरंगा अभियानांतर्गत रॅली काढण्यात आली होती,भारतीय जनता पक्षाचे नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली रॅली निघाली होती.विशेष बाब म्हणजे या रॅलीमध्ये असंख्य युवकांचा समावेश होता,रॅलीच्या माध्यमातून माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे शक्तिप्रदर्शन केले असल्याचे बोलले जात होते.
इंदापूर तालुक्यात भाजपला हर्षवर्धन पाटील यांच्या रूपाने तगडा नेता मिळाला आहे.गेल्या वर्षभरापासून राष्ट्रवादीच्या गोटात बारामती लोकसभा मतदार संघात भाजप कडून माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे संभाव्य उमेदवार असल्याची कुणकुण असल्याने,बारामती लोकसभा मतदारसंघात इंदापूर तालुका येत असल्याने व इंदापूर तालुक्यात हर्षवर्धन पाटील यांची पकड अजूनही कायम असल्याने भविष्यात हर्षवर्धन पाटील हे पवारांना कडवे आव्हान देऊ शकतात हे आजच्या रॅलीला मिळालेल्या प्रतिसादामुळे मात्र नक्की झाले.
आज झालेल्या रॅलीत इंदापूरातील युवा वर्ग मात्र माजी मंत्री हर्षवर्धन पाटलांच्या मागे असल्याचे दिसून आले.त्यामुळे भविष्यात हर्षवर्धन पाटील हे राष्ट्रवादीची डोकेदुखी ठरणार हे मात्र नक्की ?