पुणे : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
संशयित म्हणून ताब्यात घेतलेल्या नागरिकांना पोलिसांकडून नेहमीच क्रूरतेची निर्दयीपणे अमानवीय कृत्य करत नागरिकांच्या मानवी हक्कांचे उल्लंघन करणारे कृत्य सदर अधिकाऱ्याने केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.यावेळी बोलताना तक्रारदार विकास कुचेकर अध्यक्ष मानवी हक्क संरक्षण जागृती म्हणाले की पोलिसांकडून संशयित आरोपी विषयी माणुसकी सोडून वागणूक दिल्याचे प्रकार वेळोवेळी महाराष्ट्रभर घडत आहेत.
पोलीस कोठडीतील मृत्यू हा चिंतेचा विषय आहे.पुणे शहरात सामाजिक सुरक्षा विभागाचे पोलीस निरीक्षक राजेश पुराणिक यांच्याकडून संशयित लोकांना एका खोलीत डांबून लाथा बुक्क्यांनी मारहाण करत शिवीगाळ करीत असल्याचे व्हिडिओ विविध माध्यमातून वार्तांकन द्वारे प्रसिद्ध झाले आहे.स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असताना कायद्याच्या राज्यात असे प्रकार घडणे हे कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्न निर्माण करणारे आहे.यामुळेच संस्थेचे संचालक आण्णा जोगदंड यांच्या मार्गदर्शनाखाली सदर प्रकरणाची राज्य मानवी हक्क आयोगाकडे तक्रार दाखल केल्याचे सांगितले आहे.