बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
रागाच्या भरात माणूस अनेकदा आपली सद्बुद्धी गमवतो आणि मग होत्याचं नव्हतं होतं.अशीच एक घटना व रक्ताच्या नात्याला काळीमा फासणारी बारामती तालुक्यातील मोढवे येथे सख्या भावानेच भावाचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.शुल्लक कारणावरून डोक्यात कुऱ्हाड घालत मोठ्या भावाचा खून केल्यानं एकच खळबळ उडाली आहे.शेतात जाणाऱ्या वाटेवर लाकडाचे ओंडगे आडवे का टाकले याची विचारणा करीत डोक्यात कुऱ्हाड घालत खून केल्याची घटना घडली असून,तायाप्पा सोमा मोटे,वय.६० वर्षे (रा.मोटेवस्ती, ता.बारामती,जि.पुणे )असे मयत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.याप्रकरणी रामा सोमा मोटे, वय.३७ वर्षे ( रा.मोटेवस्ती,ता. बारामती,जि.पुणे ) याच्यावर वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात भा.द.वि. कलम ३०२,५०४,५०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत मयताची सून लक्ष्मी महादेव मोटे यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबत वडगाव निंबाळकर पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार,बारामती तालुक्यातील मोढवे येथील मोटेवस्ती मधील शेतात जाणाऱ्या वाटेवर लाकडाचे उंडगे आडवे का टाकले आहेत असे फिर्यादींच्या सासऱ्यांनी संशयित आरोपी रामा मोटे यांना विचारले असता, याच कारणाचा राग तर आरोपीने यांना जायचे नाही आणि आता तुला जीवंत सोडणार नाही तुला खाल्लास करतो असे म्हणत मयत तायाप्पा मोटे यांच्या हातातील कुऱ्हाड हिसकावून घेत त्यांच्या डोक्यात मारली असता, तायाप्पा यांनी हुकावल्याने ती पायांच्या पिंडरीवर लागून गंभीर जखमी झाल्याने त्यातच त्यांचा जीव गेला.असे फिर्यादींनी फिर्यादीत म्हटले आहे या गुन्ह्याचा अधिक तपास वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे हे करीत आहेत.