इंदापूर : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वर्ष दिनानिमित्त हर घर तिरंगा अभियानांतर्गत भारतीय जनता पक्षाचे नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली इंदापूर तालुका भाजपाच्या वतीने शनिवार दिनांक १३ ऑगस्ट २०२२ रोजी सायंकाळी ४.०० वाजता भव्य तिरंगा बाईक रॅलीचे आयोजन केले असल्याची माहिती भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष शरद जामदार यांनी दिली.
तिरंगा बाईक रॅलीचा मार्ग- मालोजीराजे चौक, बायपास (प्रारंभ) – संविधान चौक तहसील रोड (१०० फुटी) अकलूजनाका – श्रीराम वेस – तारेची शाळा रोड – पोरापोरांची चावडी पानदरा – नेहरू चौक- मेन रोड (पेठ) – छत्रपती शिवाजी चौक (खडकपुरा ) व्यंकटेशनगर – बाबा चौक- टेंभुर्णी नाका – दर्गा मज्जिद चौक-चाळीसफुटी रोड – नगरपालिका प्रांगण (सांगता) असा असणार असून यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याचे आवाहन भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष शरद जामदार यांनी केले.