भिगवण : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
देशाच्या अमृत महोत्सवानिमित्त “हर घर तिरंगा” अर्थात “घरो घरी तिरंगा” हा उपक्रम संपूर्ण देशभरामध्ये दि.१३ ते १५ ऑगस्ट,२०२२ या दरम्यान राबविण्यात येणार आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्यांची आठवण ठेवून आपल्या स्वातंत्र्यसैनिकांचा सन्मान या निमित्ताने जपला जाणार आहे.पुणे जिल्ह्यातील जनतेने व पोलीस प्रशासनाने देखील या उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतल्याचे दिसून येत आहे.
याच पार्श्वभूमीवर स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या अनुषंगाने इंदापूर तालुक्यातील भिगवण पोलीस स्टेशनच्या इमारतींवर काल रात्री पासून आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.शासकीय इमारतींना स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवांतर्गत १३ ,१४ व १५ ऑगस्टला विद्युत रोषणाई करावी,असे प्रशासनाने निर्देश दिले असल्याने आता तालुक्यातील सर्वच ठिकाणी इमारतींवर विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे…