Sad demice : भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते व शिरूरचे माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांचे निधन..!!


शिरूर : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. आज दुपारी १२ वाजून १५ मिनिटांनी वयाच्या ७१ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. आज दुपारी १ ते ३ या दरम्यान त्यांचे पार्थिव बाबूराव नगर येथील पाचर्णे रेस्टहाउसमध्ये अंत्यदर्शनासाठी ठेवले जाणार असून सायंकाळी ४ वाजता तर्डोबाचीवाडी येथील शिवतारा कृषि पर्यटन येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

२०१९ च्या विधानसभा निवडणूकीदरम्यानच पाचर्णे यांच्या प्रकृतीविषयी कुरबूरी सुरू झाल्या होत्या. त्या निवडणुकीतील पराभवानंतर ते राजकारणातून काहीसे अलिप्त झाले होते. दीड वर्षांपूर्वी त्यांना कर्करोगाचे निदान झाले. पुण्यातील खासगी रूग्णालयात त्यांच्यावर उपचार चालू होते. यादरम्यान, त्यांच्या प्रकृतीत अनेकदा चढउतार झाले. परंतू दीड वर्षांच्या या कालावधीत कर्करोगाने ग्रासल्याने त्यांचे इतर अवयवही निकामी होत गेले आणि आज अखेर येथील खासगी रूग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली.त्यांच्या निधनामुळे शिरूर तालुका,शिरूर शहर, पंचक्रोशी,शिरूर हवेली तालुक्यात शोककळा पसरली आहे.त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी,भाऊ,बहीण असा मोठा परिवार आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *