BIG BREAKING : पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचा वाळू माफियांना मोठा दणका ; तब्बल ७२ लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी घेतला ताब्यात..!!


दौंड : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

दौंड तालुक्यातील पूर्व भागात असणाऱ्या लिंगाळी मलटण हद्दीतील भीमा नदीपत्रात अवैधरित्या वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियांना पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने व दौंड पोलिसांनी दणका दिला असून,या पथकाने वाळू उपसा करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या दोन फायबर बोटीना जलसमाधी देत वाळूचे ६ हायवा व अवैधपणे उपसा केलेली वाळू असा एकूण ७२ लाख ३३ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.याप्रकरणी गणेश मारुती शेंडगे,घनश्याम विश्वनाथ देवकाते नवनाथ दगडू वाघमोडे,गोरख नामदेव वाघमोडे,आबा पांडुरंग सरोदे,गोरख अरुण वाघमोडे, संभाजी मनोहर येडे सर्वजण (रा.मलठण,ता.दौंड,जि.पुणे) यांच्यावर दौंड पोलीस ठाण्यात भा.द.वि.कलम ३७९,४३९ (३४), पर्यावरण (संरक्षण) अधिनियम १९८६ चे कलम २१,९ , खाण आणि खनिज (नियमन आणि विकास) अधिनियम १९५७ चे कलम ४,२१ नुसार विविध कलमांनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कर्मचारी असिफ नबिलाल शेख यांनी फिर्याद दिली आहे.

याबाबत दौंड पोलिसांनी दिलेल्या अधिक महितीनुसार, पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की,लिंगाळी-मलठण याठिकाणी फायबर बोटीच्या सहाय्याने अवैधरित्या वाळू उपसा होत असल्याची माहिती मिळाली असता,रात्री ३.०० वाजता कारवाईसाठी मलठण येथे गेले असता, दौंड पोलिसांना देखील सोबत घेत मलठण लिंगाळी येथे भिमा नदीच्या पात्रात सुरू असलेल्या वाळू उपस्यावर कारवाई करत तीन हायवा ट्रक व तीन माल ट्रक मिळून आले.इतर काहीजण पळून गेले.

त्याठिकाणी अंदाजे १०,२८,००० रुपयांची फायबर बोट अंदाजे ७००० हजार किमंतीची चार ब्रास वाळू, दुसरी फायबर बोट अंदाजे १०,००,००० त्यात तीन ब्रास वाळू अंदाजे ७००० किंमतीची,टाटा कंपनीचा हायवा अंदाजे १०,१४,००० किंमतीचा ट्रक क्र. एम.एच.१२.एच.डी. ५०६४ त्यामध्ये अंदाजे ७००० किंमतीची २ ब्रास वाळू, टाटा कंपनीचा हायवा अंदाजे १०,१४,००० रुपये किंमतीचा हायवा नं.एम.एच.१२ एच.डी.४६५७ त्यामध्ये ७००० रुपये किंमतीची २ ब्रास वाळू, टाटा कंपनीचा हायवा अंदाजे १०,१४,००० रुपये किंमतीचा हायवा क्र.एम.एच.४२.टी.६३४ त्यामध्ये अंदाजे ७००० किंमतीची २ ब्रास वाळू,लाल रंगाचा टाटा एस कंपनीचा ट्रक क्र.एम.एच.१२.एफ.झेड.८८९२ अंदाजे ७,१४,००० किंमतीचा,त्यात ७००० किंमतीची २ ब्रास वाळू, टाटा एस कंपनीचा ट्रक क्र.एम.एच.४२,टी.०१२५ त्यामध्ये दोन ब्रास वाळू,टाटा एस कंपनीचा ट्रक अंदाजे ७,१४,००० रुपये किंमतीचा एम.एच.४२.सीपी. ४९८६ त्यामध्ये अंदाजे ७००० रुपये किमतीची दोन ब्रास वाळू असा एकूण ७२,३३,००० रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

यात सहा ट्रक व त्यामधील बारा ब्रास वाळू मिळून आली असून दोन फायबर बोटी व त्यामधील सात ब्रास वाळू फायबर बोटीस पाण्यात बुडून नाश करण्यात आली असून,यात एम.एच.१२.एचडी.५०६४ या हायवा चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे.व इतर काहीजण पळून फरारी झालेले इतर चालक व त्यांचे मालक यांनी अवैधरित्या भिमानदी पात्रातून वाळू उपसा केल्याचे निदर्शनास आल्याचे फिर्यादीने फिर्यादीत महंटले आहे.

ही कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख,अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक शेळके,दौंड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे,स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपनिरीक्षक शिंदे पाटील,सहा.फौज. बाळासो कारंडे,रविराज कोकरे, पोलीस हवालदार आसिफ शेख,अभिजीत एकशिंगे, स्वप्निल अहिवळे, चालक राजापुरे या पथकासह दौंड पोलीस स्टेशनचे अमीर शेख,देवकाते,निखिल जाधव, पांडुरंग थोरात, विशाल जावळे यांच्या पथकाने कारवाई केलेली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *