बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
सह्याद्री हा फक्त महाराष्ट्रातील नाही तर भूतलावरील अद्भुत ठेवा आहे. सह्याद्रीतील प्रत्येक झाडं, फुल, फळ, प्राणी नद्या नाले या जगातील सर्वोत्तम आणि विलक्षण आहे. आपन भाग्यवान आहोत असा ठेवा आपल्या महाराष्ट्राला लाभला आहे. त्याचे जतन करणे हे फक्त शासनाचे नाहीतर प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य असल्याचे मत प्रसिद्ध पर्यावरण अभ्यासक व जेष्ठ पत्रकार अभिजीत घोरपडे यांनी व्यक्त केले आहे.
बारामती येथे बारामती ट्रेकर्स क्लबच्या चौथ्या वर्धापन दिन सोहळ्याच्या निमित्ताने बोलत होते.यावेळी बोलताना ते आपण ट्रेकिंग करत असताना फक्त टाईमपास म्हणून न करता पर्यावरणाची आवड जोपासली पाहिजे.पर्यावरणातील होणारे बदल हे मानवासाठी धोकादायक आहे.त्यामुळे निसर्ग संवर्धन करायचे असल्यास आधी त्याबद्दल आवड निर्माण होने गरजेचे आहे. आणि त्यासाठी निसर्गवाचन आणि त्याचा अभ्यास ही गोष्ट महत्वाची आहे.
या कार्यक्रम प्रसंगी पर्यावरण अभ्यासक डॉक्टर महेश गायकवाड हे देखील उपस्थित होते. त्यांनी देखील उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन केले. डॉक्टर महेश गायकवाड यांनी स्थानिक प्रजातीची होणारी वृक्षतोड ही धोकादायक आहे. तर नवीन वृक्षारोपण करताना देखील स्थानिक प्रजातीची झाडें न लावल्यामुळे स्थानिक प्राणी,पक्षी, कीटक,सरपटणारे प्राणी यांच्या प्रजनन प्रक्रियेवर देखील गंभीर परिणाम होतं आहे.यामुळे आपल्या जैवविविधतेवर गंभीर परिणाम होतं आहे. असे मत व्यक्त केले.
या कार्यक्रमात बारामती ट्रेकर्स ग्रुपचे फोटोग्राफर ऋतुराज काळकुटे व राहुल जगताप यांचा विशेष सन्मान करण्यात आला.याप्रसंगी शशांक मोहिते,नायब तहसीलदार तुषार बोरकर, बारामती ट्रेकर्स क्लबचे अध्यक्ष सचिन वाघ,मच्छिन्द्र टिंगरे आदींची भाषण झाली.प्रस्तावना योगेश वाघ यांनी केली.सूत्रसंचालन राहुल झाडे तर आभार पवार यांनी मानले.