दौंड : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
बारामती येथील जिल्हा न्यायाधीश मा.जे.एल.गांधी यांनी सुरेश बापू कोळी उर्फ तराळ मूळ ( रा.भैरववाडी, करुंदवाड ता.शिरोळ,जि.कोल्हापूर )या आरोपीस सुशांत अनिल वाडेकर रा.कुरुंदवाड,ता.शिरोळ,जि. कोल्हापूर याचा खून केल्याप्रकरणी जन्मठेपेची व अडीच हजार रुपये दंड व दंड न भरल्यास १ वर्षांची शिक्षा व पुरावा नष्ट केल्याबद्दल सहा महिने शिक्षा व ५०० रुपये दंड व दंड न भरल्यास २ महिने शिक्षा अशी शिक्षा ठोठावली आहे.
थोडक्यात हकीकत अशी की, दिनांक ०४/०६/२०१६ रोजी आरोपी सुरेश बापू कोळी उर्फ तराळ मूळ रा. भैरववाडी, कुरूंदवाड ता. शिरोळ, जि. कोल्हापूर हा व त्याचेसोबत असलेला सुशांत, अनिल वाडेकर रा. कुरुंदवाड, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर हे दोघेजण इसमनामे शशिकांत राजाराम भोई रा. कुरुंदवाड, ता. शिरोळ जि. कोल्हापूर यांचेकडील मासे महिंद्रा मॅक्स पिकअप जीप नं. एम. एच. ११/ टी/७२७४ ही मध्ये घेवून नेरी, ता. जामनेर, जि. जळगांव येथे पोहचवून परत शिल्लोड नेरी रोडवर जीप नादुरुस्त झाल्यामुळे माघारी कुरुंदवाड, ता. शिरोळ जि. कोल्हापूर येथे जात असताना दारु पिण्याच्या कारणावरून व पैशाच्या कारणावरून मौजे जिरेगांव ता.दौड येथे आल्यानंतर सुरेश बापू कोळी याने जीपमध्ये ठेवलेला तुटलेला लोखंडी भरीव रॉड सुशांत अनिल वाडेकर यांस डोक्यात मारुन त्यास गंभीर जखमी करून त्याचा खून केला व ओळख पटू नये म्हणून सुशांतच्या अंगावरील रक्ताने माखलेला शर्ट फलटण येथील कॅनॉल मध्ये पाण्यात फेकून देवून पुरावा नष्ट केलेला आहे.
सदरील केसमध्ये सरकार पक्षातर्फे एकूण १३ साक्षीदार तपासले. सदर खटल्या कामी साक्षीदार व तपासी अधिकारी यांच्या साक्ष नोंदवण्यात आल्या सदरील केसमध्ये सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील अॅड ज्ञानदेव साहेबराव शिंगाडे यांनी काम पाहिले. केसमध्ये फिर्यादी व इतर स्वाक्षीदार यांचे जबाब व सरकारी वकील अॅड ज्ञानदेव साहेबराव शिंगाडे यांनी केलेला युक्तीवाद ग्राहय धरुन में.. न्यायालयाने भा.द.वि. कलम ३०२ व २०१ अन्वये वरीलप्रमाणे आरोपीस जन्मठेपेची व अडीच हजार रुपये दंड व दंड न भरल्यास १ वर्षांची शिक्षा व पुरावा नष्ट केल्याबद्दल सहा महिने शिक्षा व ५०० रुपये दंड व दंड न भरल्यास २ महिने शिक्षा अशी शिक्षा ठोठावली आहे.
सदर प्रकरणी दौंड पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनोद प्रभु घुगे यांचे मार्गदर्शनाखाली तपासी अधिकारी अतूल भोसले, दप्तरी आर. एच फाळके यांनी कामकाज पाहिले आहे. तसेच त्यास सहा. पोलीस उपनिरीक्षक राजाराम डी. जगताप यांनी मोलाचे सहकार्य केले. तसेच एन. ए. नलवडे सहा. पोलीस उपनिरीक्षक यांनी पैरवी अधिकारी म्हणून कामकाज पाहिले.तपासाच्या दृष्टीने अवघड असलेला गुन्हा दौंड पोलीसांच्या कामगिरीमुळे उघड होवून गुन्हेगारांच्या मुसक्या आवळून त्यास न्यायालयीन प्रक्रियेत सिध्द करुन जिल्हा न्यायाधीश बारामती श्री. जे एल गांधी यांनी मुख्य आरोपीस जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे त्यामुळे दौंड पोलीसांचे कौतुक होत आहे.