BIG BREAKING : माळेगाव पोलिसांनी गोमांस वाहतूक करणारी ईनोव्हा कार पकडली ; कारवाईत सव्वा तीन लाखांचा मुद्देमाल केला जप्त..!!


माळेगाव : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

फलटण बारामती रोड वरून बारामतीकडे येणाऱ्या अवैधरित्या विक्रीसाठी गोमांस वाहतुक करणाऱ्यांना ईनोव्हा गाडीसह माळेगाव पोलिसांनी ताब्यात घेतले असुन,त्यांच्यावर भारतीय प्राणी संरक्षण कायदा,महाराष्ट्र प्राणी संरक्षण सुधारणा कायद्यांव्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.वाहन चालक रानबा नंदकुमार घुमरे, वय.३३ वर्षे ( रा.सर्वे क्र.१११, महात्मा फुलेनगर, रामटेकडी,हडपसर पुणे ) सय्यद अली हबीब शेख, वय. २४ वर्षे मूळ (रा.पाटील इस्टेट,शिवाजीनगर, पुणे ) सध्या (रा.हॉटेल निलम पॅलेस पाठीमागे बागवान वस्ती, ता. बारामती,जि. पुणे ) मुबारक कुरेशी (पूर्ण नाव माहीत नाही) ( रा.फलटण,जि. सातारा ) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी माळेगाव पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक विशाल गजरे यांनी फिर्याद दिली आहे.

याबाबत माळेगाव पोलिसांनी दिलेल्या सविस्तर माहितीनुसार,माळेगाव पोलीस स्टेशन हददीत रात्रगस्त डयुटी करीत असताना पोलिसांना गोपनीय बातमीदारांमार्फत माहिती मिळाली की,दोघेजण फलटणकडुन बारामतीकडे ईनोव्हा कार नं.एम.एच १२ / ई जी ३८१९ या गाडीतून जनावरांच्या मांसाची वाहतूक करीत असल्याची माहिती मिळाली असता,माळेगाव पोलिसांनी तात्काळ फलटण ते बारामती रोडवर सांगवी चौकात नाकाबंदी केली असता,पहाटे ०४.३० वा.च्या सुमारास फलटण बाजुकडून एक ईनोव्हा कार ने एम.एच १२ / ई जी ३८१९ ही बारामतीच्या दिशेने येताना दिसली असता,पोलिसांनी गाडी थांबवून गाडी चालकास गाडीमध्ये काय आहे असे विचारले असता,त्यांनी नकार दिल्याने पोलिसांनी गाडीची तपासणी केली असता, गाडीत मांस असल्याचे दिसून आल्याने पोलिसांनी हे मांस कशाचे आहे असे विचारले असता हे गोवर्षीय बैलाचे गोमांस असल्याचे सांगितले.गाडीत अंदाजे २०० किलो मांस असल्याचे निदर्शनास आले.तसेच हे मांस मुबारक कुरेशी याच्याकडून घेऊन ते पुणे येथे विक्रीसाठी घेवून जात आहे असे सांगितले.पोलीसांनी त्यांच्या ताब्यातील ३०,००० रुपये किंमतीचे गोवंशाचे गोमांस अंदाजे २०० किलो मांस,३,००,००० किमतीची ईनोव्हा कार नं.एम.एच १२/ई जी ३८१९ असा तब्बल
३,३०,००० किंमतीचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला असून,पशु संवर्धन विभागाचा परवाना नसताना तसेच गोवंश कापणे, वाहतुक करणे,विक्रीकरीता बंदी असताना देखील गोमांस वाहतुक करून घेवून जात असताना मिळून आल्याचे फिर्यादीने फिर्यादीत महंटले आहे.

ही कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक बारामती विभाग मिलिंद मोहिते,बारामती उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली माळेगावचे पोलीस निरीक्षक किरण अवचर पोलीस नाईक विशाल गजरे,होमगार्ड व्ही.एन. गव्हाणे,होम पारसे यांनी केलेली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *