BIG BREAKING : भारतीय जनता पार्टीचे ‘मिशन बारामती’ सुरू; केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन तीन दिवसीय बारामती मतदारसंघाच्या दौऱ्यावर..!!


बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

राज्यातील सत्तांतराच्या नाट्यमय घडामोडीनंतर आता भारतीय जनता पक्षाने लोकसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रीत करण्याचे ठरविले असून त्या दृष्टीने आतापासूनच तयारी सुरु झाली आहे.देशातील लोकसभा निवडणुकांसाठी २०२४ उजाडण्याची वाट पहावी लागणार आहे.मात्र आता संवेदनशील म्हणून ओळखल्या जाणा-या बारामती लोकसभा मतदारसंघात विजय मिळविण्यासाठी आता भाजपने कंबर कसली आहे.त्यामुळे भाजपने आत्तापासुनच बारामती लोकसभा मतदार संघ टार्गेट केला आहे.त्यासाठी बारामती लोकसभा मतदारसंघात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या तीन दिवसीय दौऱ्यावर येणार आहेत.

बारामती लोकसभा मतदारसंघात खासदार सुप्रिया सुळे यांच्यासमोर कडवे आव्हान निर्माण करण्याचे संकेत भाजपने या दौऱ्याद्वारे दिल्याचे मानले जात असून, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत खासदार सुप्रिया सुळे यांचा पराभव करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच सूचना केल्याची चर्चा होती. त्यानंतर बारामती लोकसभा मतदारसंघात भाजपच्या राष्ट्रीय नेत्यांसह मुख्यमंत्र्यांच्या सभा झाल्या.बारामतीकरांनी देखील भाजप उमेदवाराला चांगली मते दिली होती.मात्र काही हजारांच्या फरकाने भाजप उमेदवाराचा पराभव झाला होता,मात्र या पराभवाने देखील सुप्रिया सुळे यांनी घाम फोडला होता.त्यामुळे आता भाजप नेत्यांच्या बारामती लोकसभा मतदारसंघावर विजय मिळवण्यासाठी मोठ्या हालचाली सुरू असल्याच्या देखील चर्चा आहेत.

२०१९ मध्ये देशासह राज्यात भाजपला चांगले यश मिळाले होते.त्यामुळे नुकतेच विधानपरिषद आमदार राम शिंदे यांची बारामती लोकसभा प्रभारीपदी निवड करुन त्यांच्या मतदारसंघाची महत्वपूर्ण जबाबदारी देण्यात आली आहे.बारामती लोकसभा मतदारसंघाचा विचार केला असता,या मतदारसंघात धनगर समाजाची संख्या मोठ्या प्रमाणावर आल्याने राम शिंदेवर ही जबाबदारी देण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.निर्मला सीतारामन ह्या बारामती लोकसभा मतदारसंघात येऊन कार्यकर्त्यांशी चर्चा करण्यासोबतच केंद्रीय प्रकल्पांना भेटी देणे,केंद्राच्या लाभार्थ्यांसोबत चर्चा करणे अशा बाबी त्या करणार आहेत.

भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्यासह ही जागा खेचून आणण्यासाठी वातावरणनिर्मितीचा प्रयत्न होणार आहे.१६ ऑगस्ट रोजी खडकवासला व भोर,१७ रोजी इंदापूर व दौंड तर १८ ऑगस्ट रोजी बारामती व सासवड येथे निर्मला सीतारामन येणार आहेत. बारामती व सासवड येथे त्यांची पत्रकार परिषद होणार आहे.
या दौ-याची तयारी करण्यासाठी मंगळवारी (ता.९) माजी उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे बारामतीत बैठक घेणार असून त्या बैठकीला राम शिंदे,राहुल कुल,गणेश भेगडे, हर्षवर्धन पाटील,जालिंदर कामठे,भीमराव तापकीर,शरद ढमाले,वासुदेव काळे,बाळासाहेब गावडे,अविनाश मोटे, गोविंद देवकाते,पांडुरंग कचरे,सतीश फाळके उपस्थित राहणार आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *