BARAMATI CRIME : बारामती शहरातील रिंगरोडवर भरधाव वेगाने जाणाऱ्या हायवाने चिरडल्या १७ मेंंढ्या ; वाहन चालकांवर गुन्हा दाखल..!!


बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

बारामती शहरात इंंदापूर मार्गाला जोडणाऱ्या रिंगरोडवरून भरधाव वेगाने जाणाऱ्या हायवाने तब्बल १७ मेंढ्या चिरडल्याची घटना घडली आहे.शहर पोलीस तातडीने घटनास्थळी पोहचले असून अपघात झालेला रस्त्यावरील वाहतुक थांबविण्यात आली आहे.याप्रकरणी वाहन चालक नितीन बाबुराव गायकवाड,वय.४२ वर्षे ( रा. चिखली ता.इंदापूर,जि.पुणे ) याच्यावर शहर पोलीस ठाण्यात भा.द.वि.कलम ४२९,२७९,३३६ मोटारवाहन अधिनियम १९८८ चे कलम १८४,१८५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत शहर पोलीस उपनिरीक्षक सुनील नागनाथ मोटे यांनी फिर्याद दिली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की,अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी घटनास्थळी भेट देत अपघाताची पाहणी केली.डंपर (क्र. एम.एच. ११ सीएच ७५११) हा माळावरच्या देवीलगतच्या मार्गावरुन इंदापूर जोड रस्त्याकडे निघाला होता.यावेळी रस्त्यावरुन निघालेला डंपर मेंढ्या अक्षरशा: चिरडत पुढे जाऊन थांबला. रस्त्यावर मेंढ्यांचा चेंदामेंदा झाला आहे.संभाजी मोटे या मेंढपाळाच्या या मेंढ्या असुन, सुमारे १७ मेंढ्या अपघातात चिरडल्या असून, जवळपास यात मेंढपाळाचे तीन ते चार लाखांचे नुकसान झाले असल्याने घटनास्थळी मेंढपाळ महिलेचा आक्रोश पाहून उपस्थितांची मने हेलावली.

यावेळी धनगर समाजातील काही तरुणांनी आक्रमक भूमिका दाखवत मेंढपाळांना नुकसान भरपाई मिळाल्याशिवाय डंपर नेऊ दिला जाणार नसल्याची भूमिका घेतली होती.हे वाहन महेश रायते (पूर्ण माहिती नाही ) (रा.सणसर ता.इंदापूर,जि.पुणे) याच्या मालकीचे असून वाहन चालकावर जसा गुन्हा दाखल केला तसा वाहन मालकांवर देखील गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी धनगर समाजाकडून होत आहे.यामुळे आता वाहन मालकावर देखील गुन्हा दाखल होणार की नाही ? हे पण महत्त्वाचं ठरणार आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *