बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
बारामती शहर पोलिसांनी शहरातील मुजावरवाडा येथे बंद पडलेल्या पान टपरी मधून मांजा विक्री करणाऱ्या संशयित आरोपी संदीप मनोज पाटील,वय.२५ वर्षे ( रा. बारामती ) याला ताब्यात घेतले असून,त्याच्यावर शहर पोलीस ठाण्यात भा.द.वि. कलम १८८,३३६,२७८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.त्याच्याकडून तब्बल ४५ नायलॉन मांजाचे बंडल हस्तगत करण्यात आले असून,तब्बल १८ हजारांचा मांजा जप्त करण्यात आला आहे.
याबाबत,शहर पोलिसांनी दिलेल्या सविस्तर माहितीनुसार,शहर पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की,शहरातील मुजावर वाडा या ठिकाणी एकजण घराशेजारी असलेल्या हजरत पीर चांद शहावली दर्गा नावाच्या बंद पान टपरीमध्ये नायलॉन मांजा विक्रीसाठी ठेवलेला आहे अशी माहिती मिळाल्याने,पोलिसांनी दुपारच्या सुमारास त्याठिकाणी छापा मारून तब्बल नायलॉन मांजाचे ४५ बंडल अंदाजे १८ हजार किमंतीचे जप्त करत संशयित आरोपीला ताब्यात घेतले.
हे कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक बारामती विभाग मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस निरीक्षक सुनील महाडिक,महिला पोलीस उपनिरीक्षक संध्या देशमुख,पोलीस कर्मचारी तुषार चव्हाण,दशरथ कोळेकर, बंडू कोठे,कल्याण खांडेकर,पोलीस हवालदार शिंदे यांच्या पथकाने केलेली आहे.
बातमी चौकट :
बारामती मध्ये काही मांजाच्या कापण्याच्या घटना घडल्याने विविध पदके नेमून काही इसम जर नायलॉन मांजाने जाणीवपूर्वक निष्काळजीपणे पतंग उडवत असतील तर पतंग उडवणाऱ्या वर सुद्धा ३३८,३३६, ३७ प्रमाणे गुन्हा दाखल करणार आहोत. तरी सर्व नागरिकांना विनंती आहे नायलॉन मांजाची विक्री करू नका व नायलॉन मांजा ने पतंग उडू नका नाहीतर गुन्हेगार होण्याची वेळ आल्याशिवाय राहणार नाही.
सुनील महाडिक ( बारामती शहर पोलीस निरीक्षक )