बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
बारामती शहरामधील नागरिकांच्या अडचणी लक्षात घेऊन त्याकरिता केलेल्या मागण्यांच्या पूर्ततेकरिता बारामती नगरपरिषद समोर रिपाई (आठवले)पक्षामार्फत ९ ऑगस्ट २०२२ रोजी पासून धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे लेखी पत्र देण्यात आले.ज्यामध्ये भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम येथील व्यायाम शाळेमध्ये मॅट व आरसे बसवून व्यायाम साहित्यांची फिटिंग करून सदरील व्यायाम शाळा सर्वसामान्यांसाठी खुली करण्यात यावी तसेच याठिकाणी ओपन जिम देखील सुरु करण्यात यावी.
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमवर टेनिस बॉलवर सराव करण्यास व क्रिकेट सामने खेळविण्यास परवानगी देण्यात यावी.रिपाई (आठवले) पक्षाच्या आंदोलनाची दखल घेत आमराई येथील दादासोनगर, वडकेनगर आणि प्रबुद्धनगर आदी भागांतील नागरिकांसाठी जे सार्वजनिक शौचालय बांधण्यात आले होते संबंधित शौचालय बांधून तब्बल ३ ते ४ वर्ष झाले तरी लाईटची जोडणी केली गेली नाही तरी त्या ठिकाणी लाईटची व्यवस्था करण्यात यावी.
तसेच यासोबतच या भागांमध्ये आणि आमराई मधील अंतर्गत रस्त्यांवर देखील लाईटचे पोल बसविण्यात यावेत तसेच सृष्टी कॉम्प्लेक्स पाठीमागील नागरिकांसाठी ड्रेनेज लाईनची व्यवस्था करण्यात यावी या प्रमुख मागण्यांच्या पूर्ततेकरिता धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे लेखी पत्र बारामती नगरपरिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांना देण्यात आले.यावेळी पुणे जिल्हा युवक सरचिटणीस रविंद्र सोनवणे,बारामती शहराध्यक्ष अभिजीत कांबळे,मोईन बागवान आदी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) गटाचे कार्यकर्ते उपस्थित होते.