बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
बारामती शहरातील भिगवण रोड शेजारील पंचायत समिती समोरील हांगे कॉर्नरसमोर आंबा आणि जांभूळाचे झाड होते.मात्र केवळ हॉटेलला अडथळा ठरत असणाऱ्या या वृक्षांवर कुऱ्हाड चालवत ती वृक्ष संबंधितांकडून तोडण्यात आली आहे.
याबाबत बारामती नगरपरिषदेला सामाजिक कार्यकर्ते तथा वृक्षप्रेमी दयावान दामोदरे यांनी निवेदन दिले असून,यात दामोदरे यांनी महंटले आहे,की रोपे लागवडीसाठी कोटयावधी रुपये खर्च केले जातात.रोपे जगविण्यासाठी प्रयत्न केले जातात.तर दुसरीकडे अनधिकृतपणे वृक्षतोड केली जाते.अनधिकृत वृक्षतोड करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली पाहिजे.
तसेच बेकायदेशीरपणे तोडलेल्या वृक्षाचा पंचनामा व्हावा,वृक्षतोड केल्याबद्दल संबंधितांची चौकशी करून त्यांच्या वनसंरक्षण अधिनियमन कायदा २०१८ अन्वये फौजदारी गुन्हा दाखल करून कारवाई दामोदरे यांनी केलेली आहे.दरम्यान,वृक्षतोड करण्याआधी संबंधितांकडून कोणतीही परवानगी घेण्यात आली नसल्याची माहिती समोर आली आहे.त्यामुळे आता या प्रकरणात संबंधितांवर कठोर कारवाई होणार का ? की वृक्षतोड करणाऱ्यांना बारामती नगरपरिषद अभय देणार ? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.