CRIME BREAKING : अखेर ‘त्या’ नियोजनबद्ध खुनाचे गूढ उकलण्यात भिगवण पोलिसांना यश ; एकाला पोलिसांनी केले अटक..!!


भिगवण : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

पोंधवडी गावच्या हद्दीत बंडगरवाडी येथे पुणे-सोलापूर हायवेलगत असणाऱ्या पुलाजवळ एकाची निर्घृणपणे हत्या केल्याची घटना समोर आली होती.त्यानंतर आता भिगवण पोलिसांनी आरोपीचा शोध लावला असून, संशयित आरोपी आकाश वामन काळोखे वय.२३ वर्षे (रा.व्यवसाय शेती, रा.देहुगाव,विठठ्लवाडी,ता.हवेली, जि.पुणे) याला ताब्यात घेतले आहे.आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेले लोखंडी हत्यार व वेरना गाडी देखील पोलिसांनी जप्त केली आहे.संशयित आरोपीवर भिगवण पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की,पोंधवडी गावच्या हददीत बंडगरवाडी येथे पुणे सोलापुर हायवे रोड लगत असलेल्या पुलाचे जवळ एका ५० ते ५५ वर्षाच्या पुरुषाचे मयत स्थितीत आढळून आल्याने पोंधवडी गावच्या पोलीस पाटलांनी भिगवण पोलिसांना ही माहिती कळवली होती.त्याअनुषंगाने भिगवण पोलीस ठाण्यात अकस्मात मयत दाखल करून तपास चालु केला असून,मयताची ओळख पटविण्यासाठी भिगवण पोलिसांनी पुणे ग्रामीण,पुणे शहर,पिंपरी चिंचवड परिसरात तीन दिवस मयताची प्रसिध्दी करून व विविध ठिकाणचे सी.सी.टी.व्ही फुटेज व बातमीदारामार्फेत माहीती काढत संशयित आरोपी आकाश काळोखे याला देहुगाव येथुन ताब्यात घेत चौकशी केली असता,तो उडवा उडविची उत्तरे देवु लागला.परंतु त्यास पोलीसी खाक्या दाखविताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली.दि.७ जुलै रोजी घराच्या पार्कींग मधील ट्रॅक्टर ट्रॉलीची प्लेट मयत अरूण सिंह हा चोरी करत असताना संशयित आरोपीने त्यास पकडुन त्यास हाताने,लाथांनी त्यांचे तोंडावर टॉमीने डोक्यात वार करत त्याचा खुन केला.व त्यानंतर त्याची बॉडी पोंधवडी गावच्या हदद्दीत बंडगरवाडी येथे टाकल्याची कबुली दिली. पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेले हत्यार व वेरना गाडी क्र.एम.एच.१४ डी.एन. ८७९७ ही ही गाडी जप्त केली आहे.संशयित आरोपीला पोलिसांनी या गुन्हयात अटक केली आहे.या गुन्हयाचा अधिक तपास भिगवण पोलीस ठाण्याचे सहा.पोलीस निरीक्षक दिलीप पवार हे करीत आहेत.

ही कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख,अप्पर पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण मिलींद मोहीते, उपविभागीय पोलीस अधीकारी बारामती विभाग गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी सहा.पोलीस निरीक्षक दिलीप पवार, पोलीस उपनिरीक्षक सुभाष रूपनवर,पोलीस अंमलदार सचिन पवार,महेश उगले,अंकुश माने,हसीम मुलाणी, अक्षय कुंभार,गणेश पालसांडे यांनी केलेली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *