महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क :
शिरूर पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातीळ फिर्यादी अंजली कानिफनाथ पांढरकर वय.३५ वर्षे (रा.खंडाळे,ता.शिरूर यांचे पती कानिफनाथ उर्फ रमेश सावता पांढरकर वय.४०वर्षे हे सकाळी दहा वाजता फिर्यादीला शेतात सोडून त्यांच्याकडील मोटारसायकल घेऊन त्यांचा वाढदिवस असल्याने निघून गेले त्यानंतर फिर्यादींनी वारंवार त्यांच्याशी संपर्क केला परंतु फोन बंद लागला.त्यानंतर त्यांना खंडाळे गावचे पोलीस पाटील यांचेकडून फिर्यादींचे पती कानिफनाथ पंढरकर हे न्हावरा – तळेगाव रोडलगत घाटाजवळ जखमी अवस्थेत पडले असल्याची माहिती मिळाल्याने फिर्यादींनी जाऊन पाहणी केली असता,त्यांच्या नवऱ्याला अज्ञात इसमाने जीवे मारण्याच्या उद्देशाने डोक्यात दगड घालून व त्यांच्या चेहर्यावर दगड मारून चेहरा विद्रूप करून त्यांची ओळख पटू नये,असा पुरावा नष्ट केला अशी फिर्याद दिली आहे.
सदरचा गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असल्याने पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डाॅ.अभिनव देशमुख यांनी हा गुन्हा लवकरात लवकर उघडकीस आणण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांना सुचना करून बारामती विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक मिलींद मोहिते,दौंडचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश धस यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथक नेमण्यास सांगितले होते.या पथकाकडे कोणताही पुरावा नसताना गोपनीय माहितीनुसार हा गुन्हा दादाभाऊ मारुती वाघ वय.२६ वर्षे (रा.निमगाव,शिरूर, जि.पुणे) याने व त्याच्या नात्यातील एका विधीसंघर्षित बालकाच्या मदतीने केला असल्याची माहिती मिळाल्याने व हा आरोपी हा ढोक सांगवी येथे एका बिल्डिंगमध्ये लपून बसला असल्याची माहिती मिळाल्याने रांजणगाव पोलीस स्टेशनचे सपोनि येळे,पोसई मुंडे व स्टाफच्या मदतीने सापळा रचून आरोपीस ताब्यात घेत चौकशी केली असता,आरोपीने त्याच्या नात्यातील विधीसंघर्षित बालकाच्या मदतीने दारू पिताना झालेल्या भांडणाचा राग मनात धरून केल्याचे कबूल केले आहे.
या आरोपीवर यापूर्वी लोणीकंद पोलीस ठाण्यात भादवी कलम ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल आहे. सदरची कारवाई ही स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट,सपोनि सचिन काळे,तुषार पंधारे,जनार्दन शेळके,राजू मोमीन,अजित भुजबळ,मंगेश थिगळे मुकेश कदम व रांजणगावचे सपोनि येळे,पोसई मुंढे यांनी केली आहे.