राष्ट्रकुल स्पर्धेत भारताचं खातं उघडलं, संकेत सरगरने वेटलिफ्टिंगमध्ये पटकावलं रौप्य पदक..!!


मुंबई : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

बर्मिंगहॅम येथे सुरु असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी भारताचे खाते उघडले आहे.संकेत सरगरने वेट लिफ्टिंगमध्ये देशाला पहिले रौप्यपदक मिळवून दिले आहे. संकेत सुवर्णपदकापासून थोडा दूर राहिला परंतु त्याने रौप्य पदक जिंकून देशाचा मान वाढवला आहे. संकेतने पुरुषांच्या ५५ किलो वजनी गटात वेटलिफ्टिंग करताना ही चमकदार कामगिरी केली आहे. संकेतने एकूण २४८ किलो वजन उचलले. त्यापैकी स्नॅच राऊंडमध्ये ११३ किलो तर क्लीन अँड जर्कमध्ये १३५ किलो वजन उचलण्यात त्याला यश आले. यादरम्यान त्याला चुकून दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला मलेशियाच्या खेळाडूकडून पराभव स्विकारावा लागला.

मलेशियाच्या मोहम्मद अनिकने क्लीन अँड जर्कमध्ये २४९ किलो (१०७ किलो+१४२ किलो) वजन उचलून सुवर्णपदक जिंकले, तर श्रीलंकेच्या दिलंका इसुरू कुमाराने २२५ किलो (१०५ किलो+१२० किलो) वजन उचलून कांस्य पदक पटकावले.संकेत सरगरने स्नॅच विभागात त्याच्या सर्व प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकले आणि क्लीन अँड जर्कमध्ये सहा किलोग्रॅमने आघाडी घेतली होती. परंतु क्लीन अँड जर्क विभागात तो फक्त एक लिफ्ट करू शकला कारण तो दुखापतग्रस्त झाला होता. त्यामुळे दुस-या आणि तिसर्‍या प्रयत्नात १३९ किलो वजन उचलण्यात तो अयशस्वी झाला. गेल्या हंगामात भारतीय लिफ्टर्सनी पाच सुवर्णांसह नऊ पदकांची कमाई केली होती. या वर्षीही ते अशी कामगिरी करतील अशी भारतीयांना अपेक्षा आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *