मुंबई : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
काका पुतण्याला गरीब मराठा समाजाचं काहीही भलं होऊ द्यायचं नाही. काका-पुतण्याचं दुसरं दुखणं म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांनी घराणेशाहीच्या कुठल्याही माणसाला संधी न देता सर्वसामान्य मराठा समाजातील माणूस एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपद दिले. म्हणून पवार कुटुंबियांच्या पोटात कळा उठतायेत. राज्यभर इकडे-तिकडे बोंबा मारत फिरत आहेत अशा शब्दात भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार-अजित पवारांवर निशाणा साधला आहे.“मराठा समाजाला पूर्वलक्ष्यी प्रभावाने ईडब्लूएसचा लाभ देण्याचा निर्णय तत्कालिन महाविकास आघाडी सरकारने घेतला होता. मात्र, मी त्याचवेळी सांगितले होते.
कायद्यामध्ये पूर्वलक्ष्यी प्रभावाने काही देता येत नाही. हा निर्णय उच्च न्यायालयाने रद्द केल्यानंतर एक पुन्हा एकदा सिद्ध झाले. खरं तर काका-पुतण्यांना गरीब मराठा समाजाचं भले होऊ द्यायचे नाही. गरीब मराठा समाजाचं भलं करण्यापेक्षा यांना आपल्याच माणसाचं भलं करण्यात रस आहे.”,अशी प्रतिक्रिया पडळकर यांनी दिली.दरम्यान,मागील महाविकास आघाडी सरकारने राज्यात मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी न लागल्यामुळे मराठा समाजाच्या तरूणांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक म्हणजे ईडब्ल्युएस प्रवर्गातून आरक्षणाचा लाभ देण्याचा निर्णय घेतला होता.महावितरण नोकरी भरती प्रक्रियेवेळी मविआ सरकारने हा निर्णय घेतला.
परंतु शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाने हा निर्णय रद्द केला.परंतु,महाविकास आघाडी सरकारच्या या निर्णयाला काहींनी कोर्टात आव्हान दिले होते.या
याचिकेवर सुनावणी करताना हायकोर्टाने सरकारचा जीआर रद्द केला आहे.कोर्टाने दिलेल्या निर्णयानंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना माजी मंत्री अशोक चव्हाण म्हणाले,एसईबीसी संदर्भात महाविकास आघाडीने घेतलेल्या निर्णयावर मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल अनपेक्षित आहे.राज्य सरकारने त्यास तातडीने सर्वोच्च न्यायालयात आव्हान द्यावे,अशी आमची मागणी आहे.