बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
बारामतीतील काही पत्रकार व समाज सेवकांनी आठवड्यापूर्वी सोशल मीडियावर मांजा प्रकरणीआवाज उठवला असता, शहर पोलिसांनी शहरातील शाहरुख निसार अत्तार,वय.३४ वर्षे (रा.काशी विश्वेश्वर मंदिराजवळ) याला ताब्यात घेतले असून त्याच्यावर शहर पोलीस ठाण्यात भा.द.वि.कलम १८८,३३६,२८७ पर्यावरण अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत शहर पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, बारामती शहरात मांजाबाबत तक्रारी प्राप्त झाल्याने, त्याअनुषंगाने तपास करीत असताना,पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांना माहिती मिळाली की, काशीविश्वेश्वर मंदिराजवळ शाहरुख अत्तार हा आपल्या घरातून मांजा विक्री करत असल्याची माहिती मिळाली असता,शहर पोलिसांनी वेगवेगळी पथके तयार करून अत्तार याच्या घरी तपासणी केली असता,त्याठिकाणी अंदाजे सात हजार किंमतीचे विविध रंगाचे नायलॉनचे १७ बंडल आढळून आल्याने सदरचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून,संशयित आरोपीवर पर्यावरण अधिनियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक सुनील महाडिक,महिला पोलीस उपनिरीक्षक संध्या देशमुख,सहा.पोलीस फौजदार संजय जगदाळे पोलीस हवालदार रामचंद्र शिंदे, अंमलदार दशरथ कोळेकर,मनोज पवार,कल्याण खांडेकर,अजित राऊत,बंडू कोठे,अक्षय सिताप यांच्या पथकाने केलेली आहे.
बातमी कोट :
बारामती शहर पोलीस ठाण्या कडून याबाबत छापीमारी करून गुन्हे दाखल करण्यात येणार आहे नायलॉन दोर पतांगबजीमध्ये जर कोणी जखमी झाला किंवा जर नायलॉन मांजा लागून मृत्यू झाला तर सदोष मनुष्यवधासारखा गुन्हा दाखल करण्यात येईल त्यामुळे सर्व व्यापाऱ्यांनी नायलॉन मांजा विक्रीसाठी बारामतीमध्ये आणू नये असे आवाहन पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी केले आहे.