दौंड : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
दौंड तालुक्यातील गुऱ्हाळांमध्ये जाळण्यासाठी वारंवार कचरा व प्लॅस्टिक माल वापरण्यात येतो अशा तक्रारी मिळत असल्याने, पोलिसांनी केडगाव,बोरीपार्धी, दापोडी येथील गुऱ्हाळावर जाळण्यासाठी आलेल्या प्लॅस्टिक कचरा व हॉस्पिटलमधील वापरण्यात आलेल्या चपला, बुटांच्या गाड्यांवर कारवाई केली असून,याबाबत वाहन चालक व मालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
याप्रकरणी चालक अनिल हंगु गवळी,वय.४४ वर्षे (रा.मोटेवाडी,निमोणे,ता. शिरूर) मालक बाळासाहेब विठ्ठल गाडीलकर (रा.हंगेवाडी, ता.श्रीगोंदा,जि.नगर), चालक संभाजी लक्ष्मण केंद्रे,वय.४८ वर्षे (रा.माळ हीप्परगा,ता.जळकोट, जि.लातूर), चालक जटाशंकर, अंबिकाप्रसाद पांडे,वय.४० वर्षे (रा.मदराणा,रुद्रनगर, मलवा,ता. रुद्रोली,जि.बस्ती,उत्तरप्रदेश), चालक सतीश सुखदेव सोनवणे, वय.२६ वर्षे (रा.तागडगाव,ता. शिरूर, कासारा,जि.बीड),वाहन मालक विजय जयसिंग बांदल (रा.रांजणगाव,ता.शिरूर,पुणे),चालक भाऊराव मारुती इलग, वय.३२ वर्षे (रा.हिंगणेवाडी,ता. नाशिक),मालक गजानन त्रिंबक देशमुख,वय.४८ वर्षे (रा.एकलोर, ता. नाशिक),चालक फिरोज करीम शेख,वय.४० वर्षे (रा. उमरगा,जि.उस्मानाबाद),चालक वैजनाथ रायप्पा मरपल्ली,वय.४० वर्षे (रा.कापकपल्ली,ता.चूडगुप्पा,जि. बिदर,कर्नाटक) वाहन मालक तय्यब अब्दुल रज्जाक पटेल (रा. लोणी काळभोर,ता.हवेली,जि. पुणे) चालक बालाजी माणिक पवार,वय.३९ वर्षे (रा.भोसरी,ता. निलंगा,जि.लातूर) वाहन मालक शरद तुकाराम पवार (रा. रांजणगाव,ता.शिरूर,जि.पुणे) यांच्यावर यवत पोलीस ठाण्यात भा.द.वि.कलम २७०,पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ चे कलम १५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत यवत पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी राहुल शिवाजी गडदे यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की,पोलीस निरीक्षक नारायण पवार यांना गोपनीय माहिती मिळाली की, केडगाव,दापोडी, बोरीपार्धी येथील गुऱ्हाळावर कचरा व प्लॅस्टीकचा माल,वेस्टेज साहित्य त्यामध्ये चपला,बुट, प्लॅस्टीक असे साहित्य कोणतीही दक्षता न घेता गु-हाळांना इंधन म्हणून जाळण्यासाठी घेवुन येणार असून,त्यावर कारवाईचे आदेश दिले.या अनुषंगाने या वाहनाचा शोध घेत असताना चौफुला शिरूर रोडला केडगाव हद्दीत असणाऱ्या गु-हाळासमोर ही वाहने वेस्टेज साहित्य घेऊन उभी असल्याचे दिसुन आले. पोलिसांनी त्याठिकाणी वाहनांची तपासणी केली असता त्यामध्ये हॉस्पीटल मधील वापर झालेले चपला, बुट, प्लॅस्टीक असे वेस्टेज साहित्य असल्याचे दिसुन आले.
यामध्ये १४१२ मॉडेलचा अशोक लेलंड कंपनीचा ६ चाकी कंटेनर त्याचा नंबर एम.एच.१६.सी.सी.४६५९,
१६१८ मॉडेलचा टाटा कंपनीचा ६ चाकी कंटेनर त्याचा नंबर एम.एच १२.एस.एक्स.४३३४, १६१८ मॉडेलचा अशोक लेलंड कंपनीचा ६ चाकी कंटेनर त्याचा नंबर एन.एल.०१.एन.४९४९ ,एम.एच १५.सी के.७९९९, २०१९ मॉडेलचा आयशर कंपनीचा ६ चाकी वाहन त्याचा नंबर एम.एच २५.यु.१४२९,११०९ मॉडेलचा टाटा कंपनीचा ६ चाकी वाहन त्याचा नंबर एम.एच.१२.एच.डी ६०१६,२०१९ मॉडेलचा अशोक लेलंड ६ चाकी वाहन त्याचा नंबर एन.एल.०१.ए.एफ.५१९४ अशी एकूण ८ वाहने मिळून आली.त्यापैकी चार वाहने कोचिन येथील कचराकुडीतुन,दोन वाहने हैद्राबाद येथुन भंगारच्या दुकानातुन एक वाहन नाशिक येथुन भंगारच्या
दुकानातुन व एक वाहन रांजनगाव येथील कंपनीतुन आणत असल्याचे वाहन चालकांनी सांगितले.त्यामुळे वाहनमालक व वाहनचालकांना विचारणा केली असता, हा कचरा वेस्टेज प्लॅस्टीक,बुट याचा वापर गु-हाळाची भटट्टी पेटविण्यासाठी म्हणुन दिला जात असल्याचे पोलिसांना सांगितले.पोलिसांनी तात्काळ ही वाहने जप्त केली असून,यात आठ गाड्या असा १६ लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला असून,या प्लॅस्टिकच्या साहित्यामुळे मानवी जीवितास धोकादायक असलेल्या रोगाचा संसर्ग पसवरण्याचा संभव असलेली कृती करून पर्यावर्णाचा ऱ्हास होईल असे कृत्य केल्याचे फिर्यादीने फिर्यादीत महंटले आहे.याबाबत अधिक तपास यवत पोलीस करीत आहेत.
ही कामगिरी पुणे ग्रामीण अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते,दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नारायण पवार,पोलीस कर्मचारी जाधव,कापरे,भापकर,भोसले, गडदे, यांच्या पथकाने केलेली आहे.