BIG BREAKING : इंदापूर तालुक्यातील काटी येथे १५ वर्षीय विद्यार्थिनीला ट्रकने चिरडले ; मग संतप्त गावकऱ्यांनी ट्रकला लावली आग..!!


इंदापूर : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

शाळेत चाललेल्या १५ वर्षीय विद्यार्थिनीला मालवाहू ट्रकने चिरडल्याची धक्कादायक घटना इंदापूर तालुक्यातील काटी येथे आज शुक्रवारी (ता.२९) उघडकीस आली आहे.या अपघातात तृप्ती कदम असे मृत्यू झालेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे.याप्रकरणी विनोद महादेव जवरे,वय.४० वर्षे (रा.खैरा,जि.यवतमाळ) याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून,गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार,काटी गावात रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू आहे.त्या रस्त्याने तृप्ती कदम शाळेत चालली होती.तेव्हा तिला मालवाहू ट्रकने चिरडले आहे.या अपघातात तृप्तीचा मृत्यू झाला आहे.या घटनेनंतर गावकरी घटनास्थळी त्वरित जमा झाले. आणि संतप्त गावकऱ्यांनी ट्रकला पेटवून दिले आहे. या घटनेनंतर अग्निशामक दलाचे मदतीने ट्रकची आग विझवण्यात आली आहे.दरम्यान,या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी तातडीने दाखल झाले असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *