पाटस : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
दौंड तालुक्यातील पाटस गावातील भागवतवाडी येथील
जिल्हा परिषद शाळेतील ९ गरजु विद्यार्थ्यांना वह्या , पुस्तके आणि शालेय उपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले.भारतीय जनता पार्टी दौंड तालुका उपाध्यक्षच प्रमोद ढमाले यांनी स्वखर्चाने हे वाटप केले . सामाजिक जाणिवेतून ढमाले यांनी केलेल्या या कार्याचे परिसरातून कौतुक करण्यात येत आहे .
भागवत वाडी येथील जिल्हा परिषद शाळेतील काही विद्यार्थ्यांना शालेय साहित्याची आवश्यकता होती .याबाबत प्रमोद ढमाले यांना माहिती मिळाली असती त्यांनी स्वखर्चाने या वस्तुंची खरेदी केली .व या वस्तूंचे विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले.यावेळी पाटस येथील संतोष शितोळे,शाळेच्या मुख्याध्यापक खुदेजा शेख, रोहिणी ठोंबरे,अंगणवाडी शिक्षिका आशाताई पानसरे आणि बानुबाई तांबोळी आदी मान्यवर उपस्थित होते .