पुणे : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
शादी डॉट कॉमवरुन ओळख झाल्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शारीरीक संबंध ठेवले. तिच्या मोबाईलवरुन २५ लाख रुपयांचे कर्ज घेतले. प्रत्यक्षात दुसर्या तरुणीबरोबर लग्न करुन फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी खराडी येथील एका २८ वर्षीय पीडितेने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.याप्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपी शंतनु बाळासाहेब महाजन वय.२८ वर्षे (रा.न्याती इलेशिया,थिटेनगर, खराडी ) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.हा प्रकार २८ मार्च २०२२ पासून आजवर सुरु होता.
याबाबत चंदननगर पोलिसांनी दिलेल्या सविस्तर माहितीनुसार, फिर्यादी आणि संशयित आरोपी यांची शादी डॉट कॉम या लग्नाच्या वेबसाईटवर ओळख झाली.शंतनुने फिर्यादीशी मैत्री करुन त्यांना लग्नाचे आमिष दाखविले.फिर्यादींचा विश्वास संपादन करुन त्यांच्याशी शारीरीक संबंध ठेवले.त्या दरम्यान फिर्यादीच्या मोबाईलवर फिर्यादीच्या नावे वेगवेगळे अॅप डाऊनलोड करुन त्यावरुन वेळोवेळी कर्ज व पैसे घेऊन एकूण २५ लाख रुपयांची रक्कम घेतली.ती खर्च केली. फिर्यादीसोबत लग्न न करता दुसर्या तरुणीबरोबर लग्न केले. हे समजल्यावर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर या तरुणीने पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली आहे.चंदननगर पोलीस अधिक तपास करीत आहेत.