तब्बल २४ वर्षांनी मजूर कुटुंब झालं शेतकरी.. तालुका पोलिसांनी दिला दोन दिवसात न्याय…!


क्रांतिकारी आवाज संघटणेच्या पाठपुराव्याला अखेर यश

महाराष्ट्र टुडे लाईव्ह : विकास कोकरे

बारामती तालुक्यातील सोनगाव येथील मनीषा दादासो जाधव या महिलेने कांतिकारी आवाज संघटनेच्या कार्यकर्त्यांना आपल्या दोन एकर जमिनीवर बेकायदा ताबा मारल्याबाबत माहिती दिली. संघटनेच्या कार्यकर्त्यांनी महिलेसह बारामती तालुका पोलीस ठाण्यात जाऊन आपल्या सासऱ्यांची दोन एकर जमिनीवर गावातील एका इसमाने बेकायदा ताबा मारला असल्याबाबत तक्रारी अर्ज केला होता.

या अर्जात गंभीर बाब लक्षात आल्यामुळे पोलीसांनी बेकायदा जमीन बाळाकवणाऱ्या इसमाला तातडीने पोलीस ठाण्यात बोलावून घेतले. तक्रारदार यांची जमीन का ताब्यात ठेवली आहे असे विचारता त्याने उडवाउडवीची उत्तर दिली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून संबंधित इसमाला कायद्याच्या भाषेत समज दिली. त्याने लागलीच आपण ही जमीन संबंधित तक्रारदार यांना परत करतो असे सांगितले.आणि तातडीने तक्रादार महिलेस तिच्या सासऱ्याच्या नावाने परत ताबा दिला.

विशेष म्हणजे अर्जदार महिला ही घरात एकटीच शिकलेली आहे. त्यामुळेच तिने जमीन मिळवण्यासाठी प्रयत्न केला. संपूर्ण कुटुंब मजुरी करत होते ते आता चोवीस वर्षानंतर परत शेतकरी झालं आहे…. पोलिसांनी केलेल्या कारवाई मुळे आपली जमीन आपल्याला परत मिळाल्याने गरीब कुटुंब भावुक झाले होते.पोलिसांचे उपकार मानत सायब तुम्ही आम्हाला न्याय दिल्याची भावना व्यक्त केली.सदर तक्रारीचे निवारण पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधिक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश ढवाण, पोलीस उपनिरीक्षक नितीन मोहिते, पोलीस नाईक अमोल नरुटे यांनी केले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *