CRIME BREAKING : इंदापूर तालुक्यातील कळस येथे विदेशी मद्याचा साठा जप्त ; राज्य उत्पादन शुल्कने कारवाई करत केला साडे दहा लाखांचा मुद्देमाल जप्त..!!


इंदापूर : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

इंदापूर तालुक्यातील कळस गावच्या हद्दीतील नेचर डिलाईट डेअरी कंपनीच्या गेटच्या समोरील कळस – वालचंदनगर मुख्य रोड येथे (दि. २७) रोजी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने गोवा राज्यात विक्रीसाठी असलेल्या विदेशी दारूची अवैधरीत्या वाहतूक करणाऱ्या ट्रकवर कारवाई करीत अंदाजे साडे दहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करत एकाला ताब्यात घेतले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की,राज्य उत्पादन शुल्क विभागाला बातमीदाराकडून मिळालेल्या बातमीनुसार राज्य शुल्क विभागाने इंदापूर तालुक्यातील कळस गावचे हद्दीत,नेचर डिलाईट डेअरी कंपनीच्या गेटच्या समोरील कळस वालचंदनगर मुख्य रोड येथे पाळत ठेवली असता टाटा कंपनीचा ९०९ सहाचाकी ट्रक क्र.MH.42.AQ.2505 या वाहनातून गोवा राज्यात विक्री करीता असलेल्या अवैद्य विदेशी दारूची बेकायदेशीररित्या वाहतुक करताना आढळून आले.याप्रकरणी एकाला ताब्यात घेत त्याच्याजवळील चारचाकी ट्रकसह अटक करून त्याच्या
ताब्यातील इम्पिरियल ब्लू व्हिस्की १८० मिलीच्या ४०
सिलबंद बाटल्या अंदाजे किंमत रुपये सहा हजार,रॉयल स्टॅग व्हिस्की १८० मिलीच्या ४८ सिलबंद बाटल्या, मॅकडॉल नं. १ व्हिस्की १८० मिलीच्या ९६ सिलबंद बाटल्या याची अंदाजे किंमत आठ हजार ६४० रुपये व अंदाजे किंमत रुपये १५ हजार ३६० रुपये तसेच टाटा कंपनीचा ९०९ सहाचाकी ट्रक क्रं.MH.42.AQ.2505 याची अंदाजे किंमत १० लाख रुपये, मोकळे प्लॉस्टिकचे एकूण २४५ कॅरेट अंदाजे किमत ३५ हजार ५२५ रुपये असा एकूण १० लाख ६५ हजार ५२५ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.

ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क मुंबई आयुक्त कांतिलाल उमाप, संचालक (दक्षता व अंमलबजावणी) सुनिल चव्हाण,विभागीय उप-आयुक्त राज्य उत्पादन शुल्क अनिल चासकर पुणे विभाग अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क,चरणसिंग राजपूत,उप-अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क एस.आर.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, दौंड- १ विभाग मांजरे यांनी कारवाई केली.यावेळी राज्य उत्पादन निरीक्षक पोळ,दुय्यम निरीक्षक,दौंड-२ विभाग डी.बी. पाटील,सहा.दुय्यम निरीक्षक थोरात,जवान वर्ग माळी, पाटील आणि जवान नि.चालक वामने यांनी सहकार्य केले.पुढील तपास दुय्यम निरीक्षक,राज्य उत्पादन शुल्क दौंड – १ विभाग मांजरे हे करीत आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *