BIG BREAKING : दौंड तालुक्यातील पारगाव येथे अवैधरित्या दारूच्या तस्करीचा राज्य उत्पादन शुल्कने केला पर्दाफाश ; कारवाईत तब्बल ५३ लाख ९४ हजारांचा मुद्देमाल केला हस्तगत..!!


दौंड : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेट्वर्क…

दौंड तालुक्यातील पारगाव येथे अवैद्य दारूच्या तस्करीचा राज्य उत्पादन शुल्कने पर्दाफाश केला असून, यात संशयित आरोपी सुरिंदर मेला सिंग,वय.४७ वर्षे (रा.केआमपूर अजनाला,जि. अमृतसर,पंजाब ) याला अटक केली असून,त्याच्या ताब्यातील अशोक लेलंड टँकर,प्लॅस्टिक बॅरल,२४ पाण्याचे जार असा एकूण ५३ लाख ९४ हजार ४८० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.संशयित आरोपीला दौंड कोर्टात हजर केले असता,कोर्टाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

याबाबत दौंड राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाने दिलेल्या सविस्तर माहितीनुसार, राज्य उत्पादन शुल्क यांना पारगाव हद्दीत चौफुला-शिरूर रोडला यशोदीप एच.पी.पेट्रोलपंपाच्या बाजूला राजस्थान हॉटेलच्या शेजारी अवैधरित्या अतिशुध्द दारूची (ENA) ची तस्करी होणार असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली असता,राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्र. २ या पथकाने रात्री २३.१५ च्या सुमारास त्याठिकाणी छापा घातला असता,त्याठिकाणी अवैधरित्या अतिशुध्द दारूची (ENA) तस्करी होताना निदर्शनास आले. त्याठिकाणी संशयित आरोपी सुरिंदर मेला सिंग हा टँकरमधून अतिशुध्द दारू रबरी पाईपद्वारे प्लॅस्टिक बॅरलमध्ये भरतांना आढळून आल्याने संशयित आरोपीला राज्य उत्पादन शुल्कने जागीच ताब्यात घेतले.

त्याठिकाणी तपासणी केली असता अशोक लेलॅण्ड कंपनीचा सोळाचाकी टँकर क्र.जी.जे.१२.बी.वाय. ८६५७ टँकरमध्ये ३९,२०० लिटर दारू (ENA) तसेच टँकरमधून २०० लिटर क्षमतेच्या ०४ प्लॅस्टिक बॅरल अंदाजे ८०० लिटर अतिशुध्द दारू,२० लीटर क्षमतेचे २४ प्लॅस्टिक पाण्याचे भरलेले जार व इतर साहित्य असा एकूण रू.५३,९४,४८०/- किंमतीचा मुद्देमाल मिळून आल्याने मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप,अ.व.द संचालक सुनिल चव्हाण यांच्या आदेशानुसार पुणे विभागीय उप-आयुक्त अनिल चासकर, राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक सी.बी.राजपुत
उपअधीक्षक संजय आर.पाटील,युवराज एस. शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्कचे भरारी पथक क्र.२ पुणे या पथकाने केली.या कारवाईत निरीक्षक तानाजी शिंदे,दुय्यम निरीक्षक बाळासाहेब नेवसे,योगेंद्र लोळे,सर्वश्री जवान एस.बी.मांडेकर,के.आर. पावडे,जी.बी.वाव्हळे,एन.जे.पडवळ,एस.पी.धुर्वे,टी.एस. शिंदे,आर.टी.पोटे यांनी सहभाग घेतला.या गुन्ह्याचा पुढील तपास दुय्यम निरीक्षक बाळासाहेब नेवसे करीत आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *