बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
बारामती तालुक्यात काल झालेल्या पावसामुळे निरावागज येथे वीज पडून एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना काल रात्री साडे आठच्या सुमारास घडली आहे.तालुक्यात काल विजेच्या कडाक्यासह पाऊस पडला.साहेबराव नारायण पवार,वय.६० वर्षे (रा.उरळी, कांचन,पुणे ) असे वीज पडून जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
जखमी पवार हे आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वासाठी उरुळी कांचनहून बारामती तालुक्यातील निरावागज गावात गेल्या तीन ते चार दिवसापासून पाल ठोकून राहत असल्याची माहिती मिळत आहे. काल रात्री त्यांना रुग्णवाहिकेतून उपचारासाठी ससून हॉस्पिटलमध्ये दाखल केलेले असून त्यांच्या प्रकृतीबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळाली नाही