दौंड : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
दौंडचे पंचायत समितीचे प्रामाणिक गटशिक्षण अधीकारी किसन भुजबळ यांची झालेली बदली रद्द करण्यासाठी संभाजी ब्रिगेडने पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य अधिकारी यांना आज निवेदन दिले आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या ऊप मुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे यांना याबाबत चे निवेदन संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष सुनिल पासलकर यांनी दिले आहे.
गटशिक्षण अधिकारी भुजबळ यांनी आपल्या अत्य अल्प कार्यकाळात दौंड तालुक्यातील बेकायदेशीर शाळांना टाळे ठोकून दंडात्मक कारवाई करून आणले आहे तर अनेक संस्था चालक कारवाई च्या रडारवर आहेत. त्यामुळे गटशिक्षणाधिकारी भुजबळ यांची बदली रद्द करण्यासाठी मांडणी जोर धरत आहे.तर अनेकांनी पुणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनाही संपर्क साधत बदली रद्द करण्याची मागणी केली आहे.
तसेच अनेक सामाजिक संघटना याबाबत आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. बदली रद्द न झाल्यास आंदोलने होण्याची शक्यता असल्याचे दिसून येते आहे.
गटशिक्षणाधिकारी भुजबळ यांची लोकप्रियता व तळागाळातील सर्वसामान्य घटकांचा विचार करुन काम करण्याची पद्धत पाहता पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी काय निर्णय घेतात याकडे तालुक्यातील शिक्षण प्रेमी चे लक्ष लागले आहे.