भिगवण : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात वाहने चोरी व घरफोडी करणाऱ्या टोळीला भिगवण पोलीसांनी ताब्यात घेतले असून,यात जितसिंग राजपालसिंग टाक,वय २६ वर्षे (रा.वैदवाडी,हडपसर,पुणे) लकीसिंग गबरसिंग टाक वय २० वर्षे (रा.यवत,ता.दौंड, जि.पुणे )तसेच विधीसंघर्ष ग्रस्त बालकासह शिकीलकर टोळीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.त्यांच्याकडून गुन्ह्यातील वाहन चोऱ्या व घरफोड्यांचे जवळपास ४० गुन्हे उघडकीस आले आहेत.भिगवण पोलिसांनी तुळजापूर पोलिसांच्या मदतीने ही कारवाई केली असून,भिगवण पोलिसांची ही आतापर्यंतची सर्वात मोठी कामगिरी मानली जात आहे.
याबाबत भिगवन पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार १९ आणि २० जुलै दरम्यानच्या रात्री भिगवण येथून चोरीला गेलेली स्कॉर्पीओ (वाहन क्रमांक – एम. एच १४ बी. एक्स ९७६४) घेऊन चोरटे उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर येथे देवदर्शनासाठी गेल्याची माहिती भिगवण पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाला मिळाली होती. त्या अनुषंगाने भिगवण पोलिसांनी तुळजापूर पोलिसांच्या मदतीने सापळा रचून वरील तिघांना चोरीला गेलेल्या स्कॉर्पीओसह बुधवारी दि. २६ जुलै रोजी ताब्यात घेतले. या तिघांकडे सखोल चौकशी केली वरील तिघांना चोरीला गेलेल्या स्कॉर्पीओसह बुधवारी दि. २६ जुलै रोजी ताब्यात घेतले. या तिघांकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी पुणे जिल्हातील इंदापूर आणि हवेली पोलीस ठाण्यात दाखल असलेले २, पुणे शहर आयुक्तालयाच्या हद्दीत दाखल असलेले ३० गंभीर आणि पिंपरी चिंचवड हद्दीतील दाखल असलेल्या ७ गंभीर गुन्ह्यांची कबुली दिली असल्याचे भिगवण पोलिसांनी सांगितले आहे.
ही कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख,अप्पर पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण मिलींद मोहीते, उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती उपविभाग गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली भिगवण पोलीस ठाण्याचे सहा.पोलीस निरीक्षक दिलीप पवार, पोलीस उपनिरीक्षक रूपेश कदम,विनायक दडस,पोलीस अंमलदार समीर करे,सचिन पवार,महेश उगले,अंकुश माने, हसीम मुलाणी,सचिन निकम यांनी केली आहे.