Daund News : दौंड व शिरूर उपविभागातील विद्युत ट्रान्सफॉर्मर चोऱ्या करणाऱ्या मामा टोळी जेरबंद ; टोळीकडून ११ गुन्हे उघडकीस येत तब्बल पावणे सहा लाखांचा मुद्देमाल हस्तगत..!!


दौंड : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

दौंड व शिरूर उपविभागातील ट्रान्सफॉर्मर डीपी चोरणाऱ्या टोळीला यवत पोलिसांनी जेरबंद केले असून याप्रकरणी मामा उर्फ़ मुक्तार गफुर देशमुख,विशाल अर्जून काशीद,अभिषेक गोरख मोरे सर्व (रा.राहुरी,जि. अहमदनगर ) फिरोज रझाक शेख ( रा.श्रीरामपूर ) यांना ताब्यात घेतले असून,त्यांच्या ताब्यातील चोरी केलेले तब्बल शेतकऱ्यांचे ११ विद्युत ट्रान्सफॉर्मर,काळ्या रंगाची स्कार्पिओ गाडी तसेच ११० किलो अल्युमिनियमच्या तारा,व ३५० किलो तांब्याच्या तारा तसेच तांब्याचे त्रिकोणी ठोकळे असा एकूण ५,६७,७०० रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.या टोळीकडून तब्बल ११ रोहित्र (डीपी) चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.

याबाबत यवत पोलिसांनी दिलेली सविस्तर माहिती अशी की, पुण्याच्या हद्दीत असणाऱ्या शहाजी रघुनाथ रूपनवर यांच्या शेतातील व शेतकरी युवराज बोत्रे यांचे शेतातील रोहित्र स्ट्रक्चर वरून नट बोल्ट खोलून अज्ञात चोरट्यांनी खाली पाडून त्यातील अंदाजे २८० किलो वजनाच्या अॅल्युमिनियम तारा चोरल्या बाबतचा यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून,यवत पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकातील पोलीस कर्मचाऱ्यांना गोपनीय बातमीदारांमार्फत माहिती मिळाली की, अहमदनगर येथील रेकॉर्डवरील गुन्हेगार मामा उर्फ़ मुक्तार देशमुख हा त्याच्या टोळीतील साथीदारांमार्फत विद्युत ट्रान्सफार्मर चोरी करत असल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांनी तात्काळ सापळा रचत संशयित आरोपीला स्कॉरपिओ गाडीसह ताब्यात घेत अधिक विचारपूस केली असता,या आरोपीने साथीदारांच्या मदतीने पारगाव,कोरेगाव भिवर,मिरवडी मेमाणवाडी, करंदी,आपटी,डिग्रजवाडी,वाघाळे,भांबर्डे,गणेगाव, खालसा शिरुर,रांजणगाव,यवत शिक्रापुर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरी करत त्यातील, अल्युमिनियम व तांब्याच्या तारा श्रीरामपूर येथील भंगार व्यावसायिक फिरोज शेख यास विक्री केल्याचे सांगितले.या गुन्ह्यातील आरोपीचे इतर साथीदार जयराम रामभाऊ तनपुरे,सागर शिवाजी काकुळदे प्रवीण उर्फ पवन बेंजामान साळवे सुजित टेम्बे सर्व (रा.राहुरी,जि. अहमदनगर ) हे फरार असून, यातील संशयित आरोपी मामा उर्फ़ मुक्तार देशमुख हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहिती मिळाली आहे.

ही कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण पवार,पोलीस उपनिरीक्षक संजय नागरगोजे, पोलीस हवालदार निलेश कदम,गुरू गायकवाड,पोलीस नाईक अक्षय यादव,रामदास जगताप,पोलीस कर्मचारी मारूती बाराते,राहुरी पोलीस स्टेशनचे नदीम शेख, सायबर पोलिस स्टेशनचे पोलीस हवालदार सचिन गायकवाड,पोलीस कर्मचारी सुनिल कोळी यांच्या पथकाने केलेली आहे.पुढील तपास सहाय्यक फौजदार सचिन जगताप,रमेश कदम हे करीत आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *