Daund News : अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर दौंड तालुक्यातील रोटी येथे जानाई उपसा सिंचन योजनेचे पाणी पोहोचले..!!


दौंड : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

दौंड,पुरंदर आणि बारामती तालुक्यातील कायमस्वरूपी दुष्काळी भागातील सिंचनाच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्याच्या उद्दिष्टाने कोट्यवधी रुपये खर्च करून पुरंदर उपसा सिंचन व जनाई-शिरसाई सिंचन योजना कार्यान्वित करण्यात आली परंतु, ही योजना सुरू होऊनसुद्धा दौंडच्या दक्षिणेकडील भागातील अनेक गावे अद्यापही पाण्यापासून वंचित आहे. वर्षानुवर्षे शासनाची उदासीनपणा व नियोजना अभावी योजना हि कुचकामी ठरत आहे हे तितकेच खरे असले तरी तरुणांनी मनावर घेतल व लोकांचा सक्रिय सहभाग मिळाल्यास कुठलाही प्रश्न मार्गी लागू शकतो याच उदाहरण रोटी, ता. दौंड येथील माझ्या युवा सहकार्यांनी दाखवून दिल आहे.

जनाई उपसा सिंचन योजनेच्या लाभ क्षेत्रातील शेवटचे गाव असलेल्या रोटी, ता. दौंड या गावास योजना कार्यान्वित झाले पासून शेवटचे आवर्तन खरीप २०१३-१४ मध्ये मिळाले होते. वितरण कुंड ते जनाई डावा कालवा अंतर सा. क्र. ६३०० मी व तेथून पुढे हिंगणी गाड़ा शाखा कालवा द्वारे रोटी गांव हे अंतर ८४२० मी. इतके आहे व त्यापुढे ओढ्या द्वारे अंतर १५०० मी कापल्या नंतर रोटी गावातील नाले व बंधारे भरता येतात. वितरण कुंड ते रोटी गावातील बंधारे हे एकूण अंतर १६.२२० मी. असून सा. क्र. ६३०० च्या पुढे रोटी कडे जाणारा हिंगणी गाड़ा शाखा कालवा नादुरुस्त असलेने व वहन अंतर जास्त असल्याने पाणी पोहोचत नव्हते व त्यामुळे गेले अनेक वर्षे रोटी सदर सिंचन योजनेच्या लाभा पासून वंचित होते.

रोटी गावास जनाई शिरसाई उपसा सिंचन योजेनचे पाणी मिळावे यासाठी गावातील तरुणांनी एकत्र येत लोक सहभागातून या कालव्याच्या दुरुस्तीचा निर्णय घेतला व याकामी सहकार्याची मागणी माझ्याकडे केली व त्यानुसार पुणे पाटबंधारे विभागाचे मुख्य अभियंता हनुमंत गुणाले यांच्याकडे पाठपुरावा करून उपविभागीय अभियंता,जनाई शिरसाई उपसा सिंचन व्यवस्थापन उपविभाग दौंड यांचेशी मे महिन्यामध्ये झालेल्या बैठकीमध्ये हिंगणी गाड़ा शाखा कालवा दुरुस्त करण्यासाठी जलसंपदा विभागाद्वारे आवश्यक यंत्रणा व तांत्रिक सहकार्य करावे असे निर्देश दिले.त्यानुसार दि. द १५ मे २०२२ रोजी जलसंपदा विभागाद्वारे पोकलेन मशीन उपलब्ध करून कालवा दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले.

सुमारे ९ किमी लांबीच्या या कॅनॉलचे ३ महिने परिश्रम करून खोलीकरण व दुरुस्ती करण्यात आली हे काम सुरु असताना रोटी गावातील माझ्या तरुण सहकाऱ्यांनी जातीने लक्ष देत, श्रमदान करत मोठा हातभार लावला व दि. १८ जुलै २०२२ रोजी कालवा दुरुस्तीचे काम पूर्ण होऊन रोटी गावास पाणी देण्यात आले. रोटी गावातील नाला व जगताप वस्ती बंधारा भरला असून लिमकिट बंधाऱ्यामध्ये मध्ये पाणी चालू आहे व मळई बंधारा, खुरदाड नाला के ०१ व ०२ रोटी गाव बंधारा भरण्याचे नियोजन करण्यात आले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *