बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
बारामती तालुक्यातील निरावागज गावातील युवा नेतृत्व म्हणून उदयास आलेले भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाचे प्रदेश सचिव अभिजित देवकाते यांच्यावर भारतीय जनता पक्षाने मोठी जबाबदारी दिली असून, त्यांच्यावर भटक्या विमुक्त आघाडीच्या जिल्हाध्यक्ष ( संयोजक ) पदी त्यांची निवड करण्यात आलेली आहे. भाजपच्या भटक्या विमुक्त आघाडीचे प्रदेशाध्यक्ष नरेंद्र पवार यांच्या सूचनेनुसार पुणे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांच्या हस्ते नियुक्तीचे पत्र देण्यात आले.
पुणे जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीचा विस्तार करण्यासाठी पक्षाचे मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरू असून अभिजीत देवकाते यांच्यासारख्या तरुणाकडे तरुणांची मोठी फळी असलेल्या नेतृत्वाकडे ही जबाबदारी देण्यात आली असून,आपणही पक्षाने दिलेल्या या संधीचे सोने करून दाखवल्याशिवाय स्वस्त बसणार नाही.तसेच माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तीला भारतीय जनता पार्टीने एका आघाडीचा जिल्हाध्यक्ष होण्याचा मान दिला.त्याबद्दल मी पक्षातील सर्व पदाधिकाऱ्यांचा मनापासून आभारी आहे.तसेच पक्षाने ही जबाबदारी देऊन जो माझ्यावर व माझ्या आजपर्यंत केलेल्या कामावर विश्वास दाखवला असून त्या विश्वासाला मी कधीही तडा जाऊ देणार नाही.
तसेच जिल्ह्यातील कानकोपऱ्यात वसलेल्या सर्व भटक्या विमुक्त जाती जमातीचे संघटन करून तळागाळातील माणसाला पक्षाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे भटक्या विमुक्त आघाडीचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष अभिजीत देवकाते यांनी सांगितले.यावेळी भाजपा पुणे जिल्हा सरचिटणीस अविनाश मोटे, भारतीय जनता पार्टीचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष दादासाहेब सातव,भाजपा पुणे जिल्हा उपाध्यक्ष गोविंद देवकाते,भाजपा बारामती तालुकाध्यक्ष पांडुरंग कचरे,बारामती शहराध्यक्ष सतीश फाळके,भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर माने आदी पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.