दौंड : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
दौंड तालुक्यातील बी.एस.एन.ल. कार्यालयाच्या वॉचमनचा चोरट्यांच्या मारहाणीमध्ये खून झाल्याची घटना घडली आहे. प्रकाश ठाकूरदास सुखेजा,वय. ६० वर्षे,(रा.बीएसएनएल वसाहत,दौंड) असे खून झालेल्या सुरक्षारक्षकाचे नाव आहे. याप्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात अज्ञात २ ते ३ चोरट्यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत दौंड पोलिसांनी दिलेल्या सविस्तर माहितीनुसार, २६ जुलै रोजी रात्री २.३० वा.च्या सुमारास ही घटना घडल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले आहे.प्रकाश सुखेजा रात्रीच्या वेळेस बीएसएनएल कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर गस्तीवर होते.त्यावेळी अज्ञात दोन ते तीन चोरट्यांनी कार्यालयाच्या आवारामध्ये चोरीच्या उद्देशाने आले आणि त्यांनी कार्यालयातील वायर चोरली. दरम्यान प्रकाश अहुजा त्या ठिकाणी पोहोचले असता
चोरट्यांनी त्यांच्या डोक्यावर तीक्ष्ण हत्याराने वार करून त्यांना जबर जखमी केले व ते पसार झाले.
त्यानंतर प्रकाश अहुजा यांनी याच वसाहतीमध्ये राहत असलेल्या आपल्या मुलाला व सुनेला आवाज देऊन या घटनेच्या बाबतीत माहिती दिली.मुलगा मनोज याने लागलीच दौंड पोलिसांना घटनेची माहिती दिली.दरम्यान घटनेची माहिती मिळताच पुणे विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक नितेश मिटे,दौंडचे उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस,पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.