BREAKING NEWS : वा रे पठ्ठ्या ऑडी गाडी खरेदी करण्यासाठी बनावट कागदपत्राद्वारे मिळविले ४० लाखांचे कर्ज; बँक मॅनेरजरसह चौघांवर गुन्हा दाखल..!!


पुणे : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

ऑडी कार खरेदी करण्यासाठी बनावट कोटेशन तयार करुन बँक मॅनेजरशी संगनमत करुन ४८ लाख रुपयांच्या कारसाठी ४० लाख रुपयांचे कर्ज मंजूर करुन घेतले. बनावट खाते उघडून त्यात हा धनादेश वटवून ४० लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी वृषाली गव्हाणे (वय ४०,रा.कोरेगाव भीमा, शिरुर ) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.त्यानुसार पोलिसांनी सचिन ज्ञानदेव सातपुते (रा. चंदननगर),गजानन ज्ञानेश्वर साकोरे(रा.केंदूर,शिरुर), राहुल लोंढे (रा.विश्रांतवाडी) आणि कुलदीप शर्मा (रा.दत्तवाडी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार २ फेब्रुवारी २०१६ रोजी घडला होता.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,आरोपींनी ऑडी गाडी खरेदी करण्याच्या बहाण्याने फिर्यादी यांचा विश्वास संपादन केला.फिर्यादी यांच्या पतीच्या नावाने अंशुल मोटर्स या बनावट शोरुमचे पतीच्या नावे कोटेशन तसेच इतर कागदपत्रे अण्णासाहेब मगर बँकेत सादर केली.बँकेचा मॅनेजर राहुल लोंढे याने संगनमत करुन या कागदपत्रांची कोणत्याही प्रकारे पडताळणी अगर तपासणी न करता फिर्यादीच्या पतीच्या नावे सचिन सातपुते याला गाडी खरेदी करण्यासाठी ४० लाख रुपयांचे कर्ज मंजूर केले.आरोपींनी चंदननगर येथील सुवर्णयुग सहकारी बँकेत अंशुल मोटर्स या नावाने बनावट खाते उघडले.

त्या खात्यात ही कर्जाची रक्कम ट्रान्सफर केली.ही रक्कम या चौघांनी गाडी खरेदीसाठी न वापरता परस्पर ती रक्कम काढून अपहार करुन अंशुल मोटर्स या नावाने बनावट खाते उघडले.त्या खात्यात ही कर्जाची रक्कम ट्रान्सफर केली.ही रक्कम या चौघांनी गाडी खरेदीसाठी न वापरता परस्पर ती रक्कम काढून अपहार करुन फसवणूक केली.सहाय्यक पोलीस निरीक्षक गोलांडे तपास करीत आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *