जुन्नर : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
चिखली-पुणे येथून नरबळीच्या उद्देशाने जुन्नरला पळवून आणलेल्या अल्पवयीन मुलीची सुटका करण्यात जुन्नर पोलीसांना यश आले आहे.याप्रकरणी पिडीत मुलगी व महिला आरोपी विमल संतोष चौगुले,वय २८ वर्षे, व तीचा पती संतोष मनोहर चौगुले, वय ४१ दोघे (रा.महादेवनगर, जुन्नर यांना पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे ताब्यात देण्यात आले असल्याचे उपविभागीय अधिकारी मंदार जवळे व पोलीस निरीक्षक विकास जाधव यांनी सांगितले.
जुन्नरचे पोलीस उपनिरीक्षक दिलीप पवार, हवालदार भरत मुठे,पोलीस नाईक संतोष पठारे यांनी रात्री गस्त घालत असताना आज ता.२४ रोजी पहाटे ही कारवाई केली. याबाबत पवार यांना चिखली पोलीस ठाणे व पिपंरी चिंचवड पोलीस आयुक्तालय यांचेकडून माहिती मिळाली. आरोपीच्या मोबाईल लोकेशननुसार जुन्नरच्या जुन्या बसस्थानकाजवळ असणाऱ्या महादेवनगर येथून त्यांना ताब्यात घेण्यात आले.
संतोष चौगुले यांचे राहते घरात वरील आरोपी मिळून आले.संतोष याने आपल्या पत्नीने चिखली पुणे येथील तिच्या बहिणी च्या शेजारी राहणारी मुलगी पळवुन आणली असल्याचे पोलीसांना सांगितले.पोलीस अधिक्षक डाँ.अभिनव देशमुख,अप्पर पोलीस अधिक्षक मितेश घट्टे पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे,यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विकास जाधव व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी केली आहे.