BHIGWAN NEWS : भिगवणमध्ये आनंद लॉजवरील वेश्या व्यवसाय उघडकीस ; नामदेव बंडगरसह एकावर भिगवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..!!


भिगवण : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

इंदापूर तालुक्यातील भिगवन येथील आनंद लॉजवर भिगवण पोलिसांनी टाकलेल्या छाप्यामध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे उघड झाले आहे.यात परराज्यातील व राज्यातील पीडित महिलांचा सहभाग असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.याप्रकरणी हॉटेल मालक नामदेव बाळासो बंडगर,वय.४० वर्षे (रा.मदनवाडी,ता. इंदापूर,जि.पुणे),गजानन लक्ष्मण ठाकूर,वय.२४ वर्षे सध्या रा. आनंद हॉटेल,भिगवण, ता. इंदापूर जि.पुणे (मूळ,रा.गंगाखेड,जि. परभणी) यांच्यावर भिगवण पोलीस ठाण्यात स्त्रिया व मुली अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा १९५६ चे कलम ३,४,५, ६,७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत भिगवण पोलिसांनी दिलेल्या सविस्तर माहितीनुसार भिगवण हद्दीत असणाऱ्या हॉटेल आनंद मध्ये नामदेव बंडगर व गजानन ठाकूर हे स्वतः च्या आर्थिक फायद्यासाठी काही महिलांकडून वेश्या व्यवसाय करून घेत असल्याची माहिती मिळाली असता,भिगवण पोलिसांनी तात्काळ त्याठिकाणी छापा मारला यावेळी हॉटेलमध्ये तीन पीडित महिला मिळुन आल्या.या महिलांकडे अधिक विचापुस केली असता,पीडित महिलांनी नामदेव बंडगर व गजानन लक्ष्मण ठाकुर हे आमच्याकडुन वेश्या व्यवसाय करून घेत असल्याचे सांगितले असता संशयित आरोपी गजानन ठाकूर याला अटक करण्यात आली आहे.

ही कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख,अप्पर पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण मिलींद मोहीते, उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती विभाग गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी सहा.पोलीस निरीक्षक दिलीप पवार, पोलीस उपनिरीक्षक रूपेश कदम पोलीस अंमलदार इन्कलाब पठाण,महेश उगले,अंकुश माने, हसीम मुलाणी, माहिला पोलीस अंमलदार प्रिया पवार यांच्या पथकाने केलेली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *