बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
सोमेश्वर नगर येथील सोमेश्वर सहकारी साखर कारखाना परिसरातील सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सोमेश्वर हायस्कूल व ज्युनियर कॉलेज येथील शिक्षकेतर कर्मचारी म्हणून गेली २५ वर्ष सातत्यपूर्ण सेवा कर्मीं म्हणून कार्यरत असलेले सुनिल शिवाजी पाटोळे यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार १३ जुलै रोजी नवी दिल्ली येथील मुक्तधारा ऑडिटोरियम मध्ये बाबू जगजीवन राम कला संस्कृती तथा साहित्य अकादमीचे राष्ट्रीय अध्यक्ष डाॅ.नफेसिंह खोबा यांच्या हस्ते दिल्लीत प्रदान करण्यात आला.
यावेळी बाबू जगजीवन राम कला संस्कृती तथा साहित्य अकादमीचे व भारत नेपाळ दलित मैत्री संघ या आंतरराष्ट्रीय पातळीवरील आंतरराष्ट्रीय सचिव टी .एम. कुमार यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. यावेळी बाबूजगजीवन राम कला संस्कृती तथा साहित्य अकादमीचे आसाम प्रदेश अध्यक्ष हेमचद्रं बर्मन,रवी सरकार कोलकत्ता,डाॅ.मनिष गवई,अवारडीज फेडरेशनच्या ऑफ इंडियाचे सेक्रेटरी व संस्थापक अध्यक्ष डाॅ.विशाखा वेलफियर सोशल फाऊंडेशन नवी दिल्ली आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते काशिराम जी पैठणे,सावता परिषद राज्य संघटक संतोष राजगुरु,राज्य सचिव बाबू जनजीवन राम कला संस्कृती तथा साहित्य अकादमी आदी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये सुनिल पाटोळे यांना बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यावेळी आसाम,कलकत्ता ओरिसा येथील येथील सामाजिक शैक्षणिक धार्मिक राजकीय क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती व संस्थांचे प्रतिनिधी हजर होते. त्यांच्या अदितीय कार्याबद्दल त्यांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून त्यांना भारतरत्न डाॅ.बी.आर आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार पुरस्कार,बाबू जगजीवन राम राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.यावेळी बाबू जनजीवन राम कला संस्कृती तथा साहित्य अकादमीचे वतीने ३६ व्या पुण्यस्मरण दिनी राष्ट्रीय समर्पण दिन सोहळ्याच्या निमित्त विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आले असल्याचे बाबु जगजीवन राम कला संस्कृती तथा साहित्य अकादमीचे महाराष्ट्र प्रदेश सचिव प्रा.गोरख साठे यांनी बाबू जगजीवन राम यांच्या सामाजिक धार्मिक राजकीय कार्याचा लेखाजोखा ३६ व्या राष्ट्रीय समर्पण दिन सोहळ्याच्या निमित्ताने विशेष पुरस्कार प्रदान
दिनानिमित्त अभ्यासपूर्ण विचार मान्यवर व्यक्ती व संस्थांचे प्रतिनिधीसमोर व्यक्त केले.