इंदापूर : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
भारताच्या नूतन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची दिल्लीत भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी शुक्रवारी (दि.२२) भेट घेऊन देशाच्या राष्ट्रपतीपदी निवड झालेबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. यावेळी पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या व ऑल इंडिया शुगर मिल असोसिएशन च्या कायदेशीर समितीच्या सहअध्यक्षा अंकिता पाटील ठाकरे उपस्थित होत्या.देशाच्या १५ व्या राष्ट्रपती पदासाठी झालेल्या निवडणूकीची मतमोजणी गुरुवारी (दि.२१) नवी दिल्लीत पार पडली.
या मतमोजणीत द्रौपदी मुर्मू जी ह्या मोठ्या मतांच्या फरकाने विजयी झाल्या. द्रौपदी मुर्मू जी यांचा राष्ट्रपती पदाचा शपथविधी सोहळा सोमवारी (दि.२५ जुलै ) संपन्न होत आहे. देशाच्या घटनात्मक अशा सर्वोच्चपदी प्रथमच आदिवासी कुटुंबातील सर्वसामान्य महिलेची झालेली निवड ही देशवाशियांच्या दृष्टीने अतिशय आनंदाची व अभिमानास्पद अशी बाब आहे,असे भेटीत हर्षवर्धन पाटील यांनी नमूद केले. यावेळी हर्षवर्धन पाटील व अंकिता पाटील ठाकरे यांनी नूतन राष्ट्रपतीशी संवादही साधला.