Baramati News : विकास महापर्व शिलेदार मा.अजित (दादा) पवारसो — प्रा.रवींद्र कोकरे


बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क..

महाराष्ट्रातील सामाजिक व राजकीय पटलावर काही व्यक्तीमत्व आपल्या कार्यकुशलतेने नावलौकिक टिकवून आहेत. वक्तृव , नेतृत्व , दातृत्व यामध्ये माहिर असणारे. सर्वांना बरोबर घेऊन काम करणारे , दूरदृष्टी , कल्पकता , झपाटा , तडकीफड निर्णय , समयसूचकता , निर्भीड , सर्वागीण विकासाचे महापर्व असणारे माजी उपमुख्यमंत्री व विरोधी पक्ष प्रमुख मा.अजितदादा पवारसो यांचे वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन.

परखड व्यक्तीमत्व आदरणीय दादा आपल्या कार्यकौशल्याने सतत व्यग्र व व्यस्त असून सुद्धा सामाजिक सेवा सुरुच आहे. दादाच्या प्रत्येक कृतीमागे उदात्त सद्भावना असतात. एकता समता बंधूता यांचा समन्वय दिसून येतो. त्यांचे परखड वक्तव्य अनेकांना खटकते. पण भिजत घोंगड ठेवण्यापरीस मनात काहीच न ठेवता बोलून मोकळे हा दादांचा स्वभाव आहे. सतत दूरदृष्टी नजरेसमोर ठेऊन कार्य सुरु असते.

वृक्ष स्नेही आदरणीय दादांना पर्यावरण , बदलते हवामान यांचे सामाजिक भान असल्याने सतत प्रत्येक कार्यक्रमात बाराकाईन लक्ष असते. वाढदिवसाला बुके ऐवजी बुक अथवा वृक्ष लागवड सुरु असते. वृक्षाच्या सानिध्याने मानवी जिवन सुखकर होते. आपण सर्वांनी अधिकाधिक वृक्ष लागवड व जोपासना करुन दादांचे हरित स्वप्न साकार करुयात.

पाणलोट अभियान शेती व पूरक उद्योग व्यवसाय यासाठी दादांचे सतत चिंतन व नवनविन योजना सुरु असतात. ओढा खोलीकरण , बंधारे , पाणी आडवा , पाणी जिरवा , शेत शिवारात ठिबक , पाणलोट क्षेत्रातील योजना. बारामती कॕनाल सुशोभिकरण यातून दादांचे सतत नवनविन प्रयोग सुरु असतात. स्वच्छ पिण्यास जल यासाठी ग्रामस्तरांवर विविध शासनाच्या योजनेतून कार्यास भरीव मदतीचा ओघ सुरु असतो.

रस्ते ह्या जीवनवाहिन्या आदरणीय दादांनी आपल्या मतदारसंघात वाडी वस्तीवर डांबरीकरण , पाणंद रस्ते सुरु , अतिक्रमणात कोणाचाही मुलाहिजा न ठेवता योग्य मार्गाने कामास गती देणे. अधिकाधिक निधी दळणवळणाकडे वळवल्याने गतिमान व सुलभ सुखकारक प्रवास सुरु आहे. आधुनिक पद्धतीने काम झालेच पाहिजे. तडजोड न करता योग्यच ते व्हावे हा दंडक असल्याने विकास होत आहे.

वेळेला अतिमहत्व मा. दादा वेळेच्या बाबतीत खूपच जागरुक असतात. भल्या पहाटे त्यांचा प्रचंड उत्साहानं हसत मुख दादा आपल्या कार्यास सुरुवात करतात. वेळेच्या वेळी हातातील कामे मार्गी लावणे. विकासकामे , भूमीपूजन , उद्घाटन , सभा यात दादांची भूमिका कार्यक्रम वेळेत संपन्न होण्याची असते. दिवसभर अधिक बाराकाईनं विविध कार्यक्रम पार पाडताना विषयाला बगल न देता समोयोचित भाषण देण्यात त्यांचा हातखंड आहे.

विकास पर्व आदरणीय दादांनी आपल्या मतदारसंघात विकासाचे पर्व उभे केले. विकास कामे मार्गी लावत असताना तडजोड न करता भरीव कामे होणे. हा त्यांचा दंडक असतो. प्राथमिक शाळेच्या आधुनिक सोई सुविधा युक्त इमारती. शैक्षणिक साहित्य , क्रीडा साहित्य यासह गुणवत्ता वाढीचे निकष पाहिले जातात. वाड्या वस्तीवर गुणवत्तापूर्ण शिक्षण पोहचले पाहिजे. यासाठी दादांची तळमळ असते. शिक्षणा बरोबरच अनेक सहशालेय उपक्रमास चालना देऊन भावी पिढीच्या भवितव्यांची दादा सतत काळजी घेतात.

प्रशासकीय दबदबा आदरणीय दादांचा स्वभाव भिडस्त नसून नेमस्त आहे. माणसांच्या भावनेशी न कळता जिथल्या तिथं निर्णय देऊन दादा मोकळे होतात. प्रशासनावर घट्ट पकड असून प्रचंड कामाचे सतत नियोजन सुरु असते. अधिकारी , पदाधिकारी वर्ग दादांच्या बरोबरीने जबाबदारीनेच काम करीत असतो. कामात दुर्लक्ष झाल्यास दादा तिथंच ठणकावून समज देतात. प्रशासन व प्रशासकीय कामकाज दादांच्या कार्यपद्धतीने जोमाने चालू असल्याने गतिमान प्रक्रिया दिसून येते. बारामतीतील भव्य दिव्य आधुनिक प्रशासकीय भवन , आंतरराष्ट्रीय बसस्थानक , विविध सभागृहे ,पंचायत समितीचे आदर्शवत नूतन इमारत , नटराज नाट्यमंदिर यातून दादांची दूरदृष्टी अन् भविष्यकाळाची दमदार वाटचाल दिसून येते.

पुरातन वास्तूचे जतन व संवर्धन भीमथडीच्या तटावरील श्रीमंत बाबुजी नाईक यांचा वाडा , कविवर्य मोरोपंताचे स्मारक , श्रीधर स्वामीचा निवास , सिद्धेश्वर मंदिराचा कायापालट , काशीविश्वेश्वर व दर्गा यांचे सुशोभिकरण , वाड्याचा जीर्णोद्धार करुन बारामतीचे जुनं वैभव दादांच्या कल्पकतेने आजही दिमाखात इतिहासाची साक्ष देत आहे.

क-हेचा कायापालट क-हा नदीच्या दोन्हीही तिरावर दगडी भरीव जाळी संरक्षित संरक्षक बांधकाम करुन वैभवात भर घातली आहे. नदीच्या किनारी भ्रमंती करणा-या हौशी पर्यटकाची वर्दळ दिसून येत आहे. स्वच्छ , प्रवाही क-हा ही नविन ओळख दादांच्या प्रेरणेतून दिसत आहे.

स्थानिक स्वराज्य संस्था संघटन आदरणीय दादांनी दूधसंस्था , सेवा सहकारी सोसायटी , सहकारी संस्था , उद्योग , व्यवसाय , लघू उद्योग यांना पाठबळ देऊन दादा सतत संस्था संघटनांस प्रोत्साहन देत असतात. नुसत्या इमारती देखण्या असून कारभार सुरळीत होत नसून नोकर वर्गाचे संघटन हवे असते. सहकारी संस्था टिकल्या पाहिजेत .असा दादांचा निश्चय असतो.
आदरणीय दादांच्या वाढदिवसानिमित्त अनेक सामाजिक उपक्रम सुरु असतात.वृक्षरोपन ,
रक्तदान , गरजुंना सेवाभावी वस्तू वाटप , आर्थिक भरीव मदत, मुलींसाठी विशेष योजनेचा समावेश असतो. खरंच असे नेतृत्व लाभल्यामुळे बारामतीची महती सर्वदूर पोहचली आहे.

प्रा. रवींद्र कोकरे ( ग्रामीण कथाकार) ९४ २१ २१ ६८ २१


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *