BIG BREAKING : बांधकाम व्यवसायिक डी.एस. कुलकर्णीं यांना जामीन मंजूर; मोफा प्रकरणात न्यायालयाने दिला जामीन..!!


मुंबई : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

बांधकाम व्यावसायिक दीपक कुलकर्णी ऊर्फ डी.एस. कुलकर्णी यांना पुणे न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. सदनिकांच्या मालकी हक्कासंदर्भात महाराष्ट्र ओनरशिप ऑफ फ्लॅट्स अ‍ॅक्ट (मोफा) अंतर्गत दाखल करण्यात आलेल्या प्रकरणात हा जामीन मंजूर करण्यात आलाय. २०१६ साली त्यांच्या विरोधात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला.मूळ प्रकरणामधील अर्जावर सर्वोच्च न्यायालयामध्ये २६ जुलै २०२२ रोजी सुनावणी होणं अपेक्षित आहे.वकील अशुतोष श्रीवास्तव आणि वकील रितेश येवलेकर यांनी डीएसकें बरोबरच त्यांची पत्नी हेमंती कुलकर्णी यांची बाजू मांडली.

सिंहगड पोलीस स्थानकामध्ये या प्रकरणी १३ ऑगस्ट २०१६ रोजी एफाआयआर दाखल करण्यात आली होता.या एफआयआर नुसार कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नीने सदनिका खरेदी करणाऱ्या ग्राहकांकडून आगाऊ रक्कम घेतली. त्यानंतर जाणीवपूर्वकपणे डीएसके आणि त्यांच्या पत्नीने या ग्राहकांना घरांचा मालकी हक्क हस्तांतरित केला नाही. या प्रकरणी कुलकर्णी दांपत्याला ५ मार्च २०१९ रोजी अटक करण्यात आल्याचं खटल्यातील कागदपत्रांमध्ये म्हटलंय.लोकांना जास्त पैशाचं आमिष दाखवून पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डीएसके यांनी हजारो गुंतवणूकदारांना २ हजार ४३ कोटींना फसवल्याचा त्यांच्यावर आरोप होता.

याप्रकरणी त्यांची पत्नी हेमंती,मुलगा शिरीष,भाऊ मकरंद,पुतणी,जावई यांच्या विरोधातही फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.याप्रकरणी जामीन मिळावा म्हणून डीएसके आणि त्यांच्या पत्नी हेमंती यांनी अॅड आशुतोष श्रीवास्तव आणि अॅड रितेश येवलेकर यांच्या मार्फत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर युक्तिवाद पूर्ण झाल्याने न्यायालयानं आपला अंतिम निकाल राखून ठेवला होता. जो जाहीर करताना हायकोर्टानं डीएसकेंना कोणताही दिलासा न देता त्यांची याचिका फेटाळून लावली होती.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *