BIG BREAKING : शिंदे गटात सहभागी झालेल्या शिवसेनेच्या मा. खासदाराला हातपाय मोडण्याची धमकी ; शिवसेनेच्या १७ जणांवर गुन्हा दाखल..!!


महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

शिवसेनेचे शिरूर मतदारसंघाचे माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील हे एकनाथ शिंदे गटात सहभागी झाल्यानंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला तसेच त्यांचा पुतळा जाळून अश्लील भाषेत शिवीगाळ करुन लांडेवाडी येथील घरी जाऊन हात पाय तोडण्याची धमकी दिली.याप्रकरणी १७ जणांवर खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी गणेश सांडभोर,राम गावडे,महेंद्र घोलप, अमोल विटकर,सचिन पडवळ,निलेश वाघमारे,कुमार ताजणे,गोरक्ष सुखाळे,सुरेश चव्हाण,शंकर दाते, नवनाथ कोतवाल,काका कुलकर्णी,दत्ता भांबुरे,तुषार सांडभोर, बबनराव दौंडकर, चंद्रकांत भोर,बाजीराव बुचडे (सर्व रा.राजगुरुनगर,ता.खेड) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.हे सर्व शिवसेनेचे कार्यकर्ते असून आढळराव पाटलांनी शिंदे हे शिंदे गटात सामील झाल्याने पुणे-नाशिक महामार्गावर आंदोलन केले होते.

याबाबत आंबेगाव तालुक्याचे शिवसेना विभागप्रमुख अंकुश किसन शेवाळे यांनी खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शिवाजी आढळराव पाटील यांनी एकनाथ शिंदे गटात सहभागी झाल्यानंतर त्यांचा फोटो गाढवाच्या चेहऱ्यावर लावून त्यावर चप्पलने मारुन चपलांचा हार घातला.त्यानंतर त्यांच्या प्रतिकात्मक फोटोचे दहन करण्यात आले.तसेच लांडेवाडी येथील घरी जाऊ हात पाय तोडण्याची धमकी दिली.पुढील तपास पोलीस हवालदार संतोष घोलप करीत आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *