पुणे : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील आढळगाव येथे चालू असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी उत्खननाच्या परवानग्या घेतल्या का,रॉयल्टी भरली का,अशी विचार करुन कंपनीला दंडात्मक कारवाई करायची नसेल.तर दोन कोटी रुपये द्यावे लागतील,नाही तर माहिती अधिकाराखाली माहिती घेऊन कोर्टात दावा दाखल करु.अशी धमकी देणार्या माहिती अधिकार कार्यकत्याला खंडणी विरोधी पथकाने सापळा रचून पकडले.दत्तात्रय गुलाब राव फाळके,वय ४६ वर्षे (रा.मानसिंग रेसिडेन्सी,तळजाई पठार, धनकवडी) असे अटक केलेल्या RTI कार्यकर्त्याचे नाव आहे. याप्रकरणी यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या सविस्तर माहितीनुसार, फिर्यादी यांनी जामखेड तालुका,जिल्हा अहमदनगर या ठिकाणी राष्ट्रीय महामार्गाचे उत्खणाचे काम सुरू आहे. याबद्दल सगळ्या परवानग्या घेतल्या आहेत का,असे फाळके वारंवार विचारणा करत होता आणि दंडात्मक कारवाई नको असेल तर दोन कोटी रुपये द्या, अशी मागणी करत होता. संबंधित ठेकेदाराने याबाबत खंडणी विरोधी पथकाकडे तक्रार दाखल केली होती.राष्ट्रीय महामार्गाचे काम तक्रारदार करत आहेत.नगर जिल्ह्यातील जामखेड परिसरात तक्रारदाराच्या कंपनीकडून सध्या रस्त्याचे काम करण्यात येत आहे. दरम्यान,आरोपी फाळके ठेकेदारास भेटला.
तुमच्या कंपनीकडून बेकायदा उत्खनन करण्यात आलेले आहे.या कामाची रीतसर परवानगी घेण्यात आलेली नाही, उत्खननाचे शुल्क भरलेले नाही. त्यामुळे दंडात्मक कारवाई होऊ शकते.ती टाळायची असेल तर दोन कोटी रुपये द्यावे लागतील, अशी धमकी त्याने दिली होती.
खंडणीविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांच्याकडे संबंधित ठेकेदाराने तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी पुणे-सातारा रस्त्यावर सापळा लावला. यावेळी ठेकेदाराकडून २५ लाखांची खंडणी घेताना फाळके याला पकडण्यात आले. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने २५ जुलैपर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.पुढील तपासही सुरू आहे.