मुंबई : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना अटक करण्यात आली आहे. ईडीने ही कारवाई केली आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे आणि एनएसईच्या सीईओ चित्रा रामकृष्ण यांच्यावर बेकायदेशीरपणे फोन टॅपिंग केल्याप्रकरणी सीबीआयने गुन्हा दाखल केला होता. ८ जुलैला सीबीआयने ही कारवाई केली होती. त्यापाठोपाठ आता ईडीने फोन टॅपिंग प्रकरणात संजय पांडे यांना अटक केली आहे.
३० जूनला संजय पांडे हे सेवेतून निवृत्त झाल्यानंतर ईडीने त्यांना नोटीस बजावली. त्यानंतर चौकशीसाठीही बोलावलं होतं. आता सीबीआयने त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. संजय पांडे आणि चित्रा रामकृष्ण यांनी एक ऑडिट कंपनी स्थापन केली होती. २०१८ पासून ही कंपनी एनएसई स्कॅमचा तपास करत आहेत. २००९ ते २०१७ या कालावधीत शेअर मार्केट कर्मचाऱ्यांचे फोन बेकायदेशीर पद्धतीने टॅप केल्या प्रकरणी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.