Pune Crime : भाजपच्या माजी जिल्हाध्यक्ष पुण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल..!!


पुणे : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

पिडीत महिलेच्या तक्रारीवरुन सोलापूर भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुण्यातील डेक्कन जिमखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.देशमुख यांच्याविरोधात एका महिलेने बलात्काराचा आरोप केला होता. त्यानंतर देशमुख यांनी भाजप जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता.पुण्यात राहणाऱ्या पीडित महिलेने डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर श्रीकांत आप्पासाहेब देशमुख यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला.

देशमुख आणि महिलेची ओळख झाली होती.त्यावेळी मागील तीन वर्षापासून पत्नीशी मतभेद झाले आहेत. त्यामुळे पत्नीला लवकरच घटस्फोट देणार असल्याची बतावणी देशमुख यांनी महिलेकडे केली होती.त्यानंतर देशमुख यांनी बलात्कार केला,असे फिर्यादीत नमूद केले आहे. श्रीकांत देशमुख यांनी महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केला.तसेच याबाबत कोणाकडे वाच्चता केल्यास आईला जीवे मारण्याची धमकी देशमुख यांनी दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.पुढील तपास डेक्कन पोलीस करीत आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *