BIG BREAKING : बारामतीत बेकायदेशीर रित्या लोखंडी तलवार व पिस्टल बाळगणाऱ्या दोघांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..!!


बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क..

बारामती शहरातील रेल्वे ब्रिज परिसरात बेकायदेशीर रित्या विनापरवाना लोखंडी तलवार व पिस्टल बाळगणाऱ्या दोघांना शहर पोलिसांनी ताब्यात घेतले असून,किरण केशव अटक, वय.२३ वर्षे (रा.खामगाव, ता.दौंड,जि.पुणे ),अजय बारकू गायकवाड,वय.२३ वर्षे (रा. चंदननगर, माळेगाव, ता.बारामती, जि.पुणे ) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. विनापरवाना शस्त्र बाळगल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात भारतीय हत्यात कायदा कलम ४,२५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत पोलीस शिपाई अकबर कादिर शेख,वय.३२ वर्षे यांनी फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, शहर पोलीस अंमलदार करे यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की,दोघेजण बारामती रेल्वे ब्रिजजवळ दोन थांबलेले असुन त्याच्या जवळ ओमनी गाडी क्र. MH.14.AV. 4927 ही गाडी संशयितरित्या थांबली असल्याची माहिती मिळताच,शहर पोलिसांनी त्याठिकाणी जात खात्री केली असता,पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी केली असता,त्यांनी उडवाउडवीची असमाधानकारक उत्तरे दिल्याने,पोलिसांचा संशय अधिक बळावल्याने त्यांच्या कडील गाडीची पाहणी केली असता,गाडीच्या डिक्कीत कापडी पिशवी मिळून आली,त्यामध्ये एक तलवार व एक काळ्या रंगाचे पिस्टल मिळुन आले.यामध्ये अंदाजे ५०० किमतीची लोखंडी तलवार व अंदाजे १००० रुपये किंमतीचा पिस्टल व अंदाजे ५०, हजारांची ओमनी गाडी असा ५१५०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.या
गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस नाईक आप्पा करे हे करीत आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *