पुणे : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
सात बाऱ्यावर जागेची नोंद लावण्यासाठी तब्बल वीस हजारांची लाच मागणाऱ्या हवेली तालुक्यातील तलाठी कार्यालयातील कोतवाल नामदेव बाबुराव शिंदे,वय.४८ वर्षे याच्याविरुद्ध पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे.नामदेव शिंदे याच्यावर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.
याप्रकरणी ४६ वर्षीय तक्रारदाराने पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २७ आणि २८ जून रोजी पडताळणी केली असता आरोपी नामदेव शिंदे याने लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार सोमवारी गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली.ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे,अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे पथकाने केली. पुढील तपास पोलीस उप अधीक्षक सीमा आडनाईक करीत आहेत.