दोघांविरोधात बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…
बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
नवरा बायकोच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे.दारूच्या नशेत नवऱ्यानेच आपल्या मित्राला आपल्या बायकोवर लैंगिक अत्याचार करायला लावल्याची धक्कादायक घटना बारामती तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या तांदुळवाडीत घडली आहे. पोलिसांनी नराधम पतीसह त्याच्या मित्राला अटकही केली आहे.याप्रकरणी शेखर सयाजी माळशिखारे (रा. बेलदारपाटी,तांदुळवाडी,ता. बारामती,जि.पुणे ) याच्यावर तालुका पोलीस ठाण्यात भा.द.वि कलम ३७६,३२३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत ३० वर्षीय पीडित महिलेने फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, पीडित महिला ही आपल्या पतीसह तांदुळवाडी परिसरात राहते.पीडिता ही संशयित आरोपी माळशिकारे याला ओळखत असून,संशयित आरोपीचे फिर्यादींच्या घरी नेहमी येणे जाणे असायचे.काल रात्री संशयित आरोपी माळशिखारे हा पीडितेच्या पतीसोबत त्याच्या घरी गेला होता.
त्यावेळी या विवाहितेच्या पतीने त्याला पत्नीशी संभोग करण्यासाठी प्रोत्साहित केले असता, संशयित आरोपीने शेखर माळशिकारे याने पीडित विवाहितेला मारहाण करत तिच्यावर लैंगिक अत्याचार केले.या घडलेल्या प्रकारानंतर संशयित आरोपीने व नराधम पतीने आपल्या मुलांना देखील लथाबुक्क्यांनी मारहाण केली असल्याचे पीडितेने फिर्यादीत महंटले आहे.या गुन्ह्याचा अधिक तपास तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश लंगूटे हे करीत आहेत.