Indapur News : वरकुटे खुर्दला कालवा फुटीने शेतकऱ्यांच्या नुकसानीचे शासनाकडून पंचनामे – हर्षवर्धन पाटील


हर्षवर्धन पाटील यांच्याकडून फुटलेल्या कालव्याची पाहणी

इंदापूर : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

इंदापूर तालुक्यातील वरकुटे खुर्द येथे पत्रे वस्ती परिसरात नीरा डावा कालवा फुटल्याने शेती पिकांचे, फळबागांचे, शेततळ्याचे नुकसान झाले असून, अनेकांच्या राहत्या घरात पाणी शिरल्याने हानी झाली आहे. तसेच शेतातील माती वाहून गेली आहे. त्यामुळे सर्व नुकसानीचे तातडीने पंचनामे करून अहवाल शासनाकडे पाठविण्यात येईल, अशी माहिती भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी शनिवारी (दि.१६) दिली.

हर्षवर्धन पाटील यांनी वरकुटे खुर्दला सकाळी भेट देऊन पत्रे वस्ती येथे शुक्रवारी सायंकाळी फुटलेल्या नीरा डाव्या कालव्याच्या घटनास्थळास भेट दिली व नुकसानग्रस्त शेती पिकांची पाहणी केली.यावेळी नुकसानग्रस्त पिकांची हर्षवर्धन पाटील यांनी दुचाकीवरून प्रवास करून पाहणी केली व शेतकरी, ग्रामस्थांची संवाद साधला.यावेळी अधिकारी वर्ग उपस्थित होता. शेतकऱ्यांच्या झालेल्या सर्व नुकसानीचे पंचनामे लवकर पूर्ण केली जातील व फुटलेल्या कालव्याचीही तातडीने दुरुस्ती केली जाईल,असे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.

याप्रसंगी हर्षवर्धन पाटील यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून सूचना केल्या.यावेळी निरा भिमा कारखान्याचे संचालक अँड.कृष्णाजी यादव, महादेव मिसळ, शशिकांत शेंडे, किशोर पवार,शिवाजी यादव, गोरख अदलिंग,दादाराव शेंडे,पांडुरंग हेगडे,राजकुमार जठार, बाळासाहेब शेंडे,वजूद्दीन मुलाणी,बबलू पठाण, नितीन शेंडे, इम्रान पठाण,अरुण भोंग, मारुती शेंडे, कुंडलिक ठवरे,अमोल शिंदे आदी उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *