Crime News : जबरी चोरीच्या गुन्ह्यातील नऊ वर्षापासून फरार गुन्हेगाराच्या ग्रामीण पोलीसांनी आवळल्या मुसक्या..!!


फलटण ग्रामीण पोलीसांची धडाकेबाज कामगिरी

फलटण : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत फलटण- पंढरपूररोड वरून जात असताना,ट्रॅक ड्राइव्हरला चार अज्ञात आरोपींनी चाकूचा धाक दाखवत लुटल्याच्या प्रकरणातील फरार आरोपीला फलटण ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले असून,गुलजार उर्फ महेंद्र मिस्टींग्या काळे,वय. २२ वर्षे (रा.बावडा,ता.इंदापूर, जि.पुणे) डुब्ल्या छबु काळे,वय.२८ वर्षे (रा.फोंडशीरस, ता. माळशिरस,जि.सोलापूर ) जॉकी डाय-या पवार,वय. २४ वर्षे (रा.भिमनगर,धर्मपुरी,ता.माळशिरस,जि. सोलापूर) लखन डाय-या पवार ( रा.भिमनगर,धर्मपुरी,ता. माळशिरस,जि.सोलापूर) असे अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत

याबाबत फलटण ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार,फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत जाने २०१४ मध्ये फलटण- पंढरपूर रोडने जात असताना ट्रक ड्राइव्हर गाडीत पाणीत भरण्यासाठी थांबले असताना,चार अज्ञात आरोपींनी चाकूचा धाक दाखवत ड्रायव्हरकडील रोख १० हजारांची रक्कम व एक मोबाइल हँडसेट चोरून नेल्याची घटना घडली होती. याप्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस तपास करीत होते,मात्र संशयित आरोपी लखन पवार हा २०१४ पासून वेळोवेळी राहण्याची ठिकाणी बदलून मोबाईल हँडसेटचा वापर न करता पोलिसांना गुंगारा देत होता. फलटण ग्रामीण पोलीस निरीक्षक गोडसे यांना हा आरोपी फलटणला आल्याची माहिती मिळाली असता पोलिसांनी सापळा रचत त्याला ताब्यात घेतले आहे.या गुन्ह्यातील चोरीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.

ही कारवाई सातारा पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल, अप्पर पोलीस अधीक्षक सातारा अजित बो-हाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी,फलटण तानाजी बरडे यांच्या मार्गदर्शनाखाली फलटण ग्रामीण पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे,सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे,पोलीस उपनिरीक्षक सागर अरगडे, पोलीस अमंलदार सुधाकर सूर्यवंशी,दादासाहेब यादव, महेश जगदाळे व गणेश अवघडे यांच्या पथकाने केलेली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *